dj star Sophie Xeon dies after terrible accident watching full moon 
मनोरंजन

पौर्णिमेचा चंद्र पाहणे पडले महागात; जीव गमावला

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - ग्रॅमीचे नामांकन असलेल्या स्कॉटिश ट्रांन्सजेंडर संगीतकार सोफी शेयॉनचे निधन झाले आहे. ती 34 वर्षांची होती. शनिवारी झालेल्या एका अपघातात तिचा मृत्यु झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शेयॉनच्या टीमनं ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे. तिच्या जाण्यानं हॉलीवूड संगीतामधील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. अथक संघर्षातून सोफीनं आपल्या संगीतातून वेगळा ठसा उमटवला होता. पाठीशी कुणीही गॉडफादर नसताना तिनं मिळवलेली लोकप्रियता कौतूकाचा विषय होती.

सोफीच्या अपघाताविषयी माहिती देताना तिच्या टीमनं सांगितले की, वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी तिला एका अपघाताला सामोरं जावं लागलं. तिचं निधन ग्रीकची राजधानी एथेंस येथे पहाटे चार वाजता झाले. सोफीच्या टीमनं सोशल मीडियावर याबाबतची अधिक माहिती प्रसिध्द केली आहे. त्यांनी सांगितले, सोफीला पौर्णिमा पाहायची होती. त्यावेळी ती पाय घसरुन पडली. तिच्या ज्याठिकाणी गेली ती निसरडी जागा होती. हे तिच्या काही लक्षात आले नाही. घसरुन पडल्यानं तिला गंभीर दुखापत झाली. त्यात तिचा मृत्यु झाला.

सोफीनं 2015 मध्ये प्रख्यात गायिका मॅडोना सोबत गाणं गायलं होत. त्यावेळी त्यांनी एका अल्बमची निर्मितीही केली होती. तो मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला होता. त्यानंतर तिनं  Charli XCX बरोबर EP Vroom Vroom ही तयार केले होते. सोफीच्या जाण्यानं अनेक प्रसिध्द संगीतकार, तिच्या चाहत्यांनी दु;ख व्यक्त केले आहे.   तिला श्रध्दांजली वाहताना ब्रिटीश गायक आणि गीतकार सॅम स्मिथ म्हणाला, सोफीच्या निधनाचे वृत्त ऐकताच तीव्र धक्का बसला. ह्रद्य पिळवटून टाकणारी ही बातमी आहे. आमच्या पिढीसाठी ती एक आयडॉल होती. हे सांगावे लागेल. प्रामाणिक, कष्टाळु असे तिचे वर्णन करता येईल. 

फ्रान्सचा प्रसिध्द पॉप कलाकार क्रिस्टीन आणि क्वींस यांनीही सोफीला श्रध्दांजली वाहिली आहे. ते म्हणाले, एक स्टार कलाकार आज आपल्यातून निघून गेला आहे. याचे अतिशय वाईट वाटते. जिनं आपल्यातील अदाकारीनं सर्वांना जिंकून घेतले. प्रेक्षकांना निखळ आनंद दिला. तिची उणीव नेहमीच जाणवेल. डीजे आणि निर्माता इरोल अलकाननंही सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यानं सोफीच्या निधनाची बातमी वाचून धक्का बसल्याचे सांगितले. 

  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT