tanushree payal 
मनोरंजन

'माझ्या लैंगिक शोषणाच्या आरोपांची तुलना पायल घोषच्या आरोपांसोबत नको'- तनुश्री दत्ता

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूडमध्ये  मीटू अंतर्गत सगळ्यात मोठा लैंगिक शोषणाचा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. तनुश्रीने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर छळ केल्याचा आरोप लावला होता. यानंतर मग बॉलीवूडमध्ये अनेकींनी लैंगिक शोषणाचे आरोप केल. आता अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शौषणाचा आरोप केला आहे. या प्रकरणात तनुश्री दत्ताने तीचं मौन सोडलंय. तनुश्रीने सगळ्यांना विनंती केली आहे की तिने केलेल्या आरोपांंची तुलना पायल घोषच्या आरोपांसोबत करु नका. 

अभिनेत्री तनुश्री दत्ताने एका एंटरटेन्मेंट वेबसाईटला दिलेल्या स्टेटमेंटनुसार तनुश्री म्हणाली की ती इतर लोकांसारखीच पायल घोषच्या केसच्या बाबतीत कन्फ्युज आहे आणि म्हणून यावर कोणती प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. स्टेटमेंटमध्ये तनुश्री म्हणाली, 'काही पेड प्रचार करणारे पत्रकार आणि ट्विटर ट्रोलर्स माझ्या केसची तुलना पायल घोषच्या केससोबत करत आहेत जेणेकरुन नाना पाटेकर यांना त्रास दिल्याच्या या केसमध्ये त्यांची प्रतिमा चांगली करु शकतील.'

नाना पाटेकर यांच्यावर आरोप करत ती म्हणाली की 'अनेक पुरावे दिल्यानंतरही त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेला खरेदी केलं आणि तिच्यावर कायदेशीर अत्याचार देखील केला. मात्र 'हॉर्न ओके प्लीज'च्या दरम्यान दिला गेलेला त्रास बॉलीवूडच्या इतिहासात एक काळा डाग आहे आणि हा तोपर्यंत राहिल जोपर्यंत मला न्याय मिळत नाही आणि माझं अभिनयाची कारकिर्द पुन्हा सुरु होत नाही. या अपराधासाठी कोणाला तरी किंमत चुकवावीच लागेल.'   

do not compare my harassment case to payal ghosh sexual harassment allegations says tanushree dutta  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway Accident : महामार्गावर ट्रॅव्हल अन् ‘ट्रेलर’चा भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

ठरलं तर मगची घसरण कायम पण तू हि रे माझा मितवाने गड राखला ; जाणून घ्या या आठवड्याचा टीआरपी

Bhiwandi: भिवंडी महापालिकेत बदलींचा धडाका, कामगार संघटनांची तीव्र नाराजी; कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

Jyotiba Temple : २५९ कोटींचा विकास आराखडा; जोतिबा-यमाई मंदिराचा होणार भव्य कायापालट

SCROLL FOR NEXT