TV Actress Dolly Sohi Cancer:  Esakal
मनोरंजन

Dolly Sohi Cancer: 'हिटलर दीदी' फेम अभिनेत्री देतेय कॅन्सरशी झुंज! चाहत्यांसोबत शेयर केल्या वेदना...

टीव्ही सीरियल 'भाभी' फेम अभिनेत्री डॉली सोही हिला कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे.

Vaishali Patil

TV Actress Dolly Sohi Cancer: टिव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री डॉली सोही हिने तिच्या अभिनयाने मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'भाभी' फेम अभिनेत्री डॉली सोहीने नुकतंच 'परिणिती' या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे.

मात्र आता डॉलीने एक धक्कादायक माहीती चाहत्यांसोबत शेयर केली आहे. तिने माहिती दिली आहे की तिला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाला आहे. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून भावनिक नोट लिहिली आहे. या पोस्टमध्ये डॉलीने तिचा बाल्ड लूक फोटो शेअर केला आहे.

डॉलीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'तुमचे प्रेम आणि प्रार्थनांबद्दल सर्वांचे आभार. अलीकडे आयुष्य एक रोलर कोस्टर झाले आहे, परंतु जर तुमच्यात लढण्याची ताकद असेल तर तुमचा प्रवास सुकर होईल. तुम्ही काय निवडता त्यावर सगळं काही अवलंबून आहे. प्रवासाचा बळी किंवा प्रवासातून जगणं.

कर्करोग हा एक गंभीर आजार आहे ज्याचा आपण योग्य उपचार आणि संयमाने पराभव करु शकतो. आता डॉलीने ही लढाई जिंकली आहे. त्यामुळे डॉली आता तिच्या चाहत्यांसाठी एक प्रेरणा बनली आहे.

आपल्या आजाराविषयी डॉली सिंगने ETimes शी संवाद साधला होता. या वेळी तिने सांगितलं की, तिला सुरुवातीला काही लक्षणे दिसली आणि नंतर तिला कर्करोगाचे निदान झाले. तिला 6-7 महिन्यांपूर्वी काही लक्षणे दिसली होती मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केले.

जेव्हा तिचा त्रास वाढला त्यावेळी ती स्त्रीरोगतज्ञाकडे गेली आणि काही चाचण्या करून घेतल्या. चाचण्यानंतर गर्भाशय काढून टाकावं लागेल असं तिला सांगण्यात आलं होतं.

त्यानंतरच्या चाचण्यानंतर तिला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्याचे आढळून आले. त्यानंतर तिने यावर उपचार घेणे सुरु केले. आता ती ही लढाई लढत आहे. तिची केमोथेरपीचालू आहे.

48 वर्षीय डॉली सोहीने तिच्या अभिनय कारकिर्दीत अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. डॉलीने "देवों के देव महादेव, हिटलर दीदी, कुसुम आणि भाभी" सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तिने कोलकाता आणि काश्मीरमध्ये तिच्या आगामी 'झनक' शोचे शूटिंग पूर्ण केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: धक्कादायक! वादानंतर पत्नीचा पारा चढला, रागाच्या भरात पतीच्या प्राइवेट पार्टवर ब्लेडने वार अन्...; नेमकं काय घडलं?

Vasai Protest : महावितरणच्या दुर्लक्षामुळे नंदाखाल परिसरात वीज पुरवठा खंडित, संघर्ष समितीचा आक्रोश

Latest Marathi News Live Update : चांदवडला काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

Mumbai News: गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग, किनारी रस्ता प्रकल्पाला गती द्यावी; पालिका आयुक्तांचे निर्देश

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

SCROLL FOR NEXT