Shah rukh Khan Google
मनोरंजन

Pathaan रिलीज होतोय अन् चर्चा Don 3 ची रंगलीय..शाहरुख उद्या म्हणे डबल धमाका करणार..जाणून घ्या

Trade Analyst सुमित कडेलनं एक ट्वीट केल्यानं सोशल मीडियावर सध्या 'पठाण'पेक्षा अधिक 'Don 3' ट्रेन्ड होताना दिसत आहे.

प्रणाली मोरे

Pathaan : शाहरुख खान उद्या म्हणजे २५ जानेवारी,२०२३ रोजी धमाकेदार अंदाजात सिल्व्हर स्क्रीनवर कमबॅक करतोय. तब्बल ४ वर्षांनतर शाहरुख 'पठाण' बनून मोठ्या पडद्यावर दस्तक देणार आहे.

सोशल मीडियाच नाही तर थिएटरमध्येही आता चर्चा रंगलीय ती फक्त शाहरुखची. कोरोनाच्या काळानंतर पहिल्यांदा बड्या सुपरस्टारच्या सिनेमाविषयी इतकी उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पहायला मिळत आहे.

पण आता 'पठाण'च्या रिलीज आधी 'डॉन ३' ट्रेंड होताना दिसत आहे.(Don 3 trended before the release of Pathan Shahrukh Khan double dhamaka)

फरहान अख्तरने आपलं प्रॉडक्शन हाऊस एक्सेल एंटरटेन्मेंटच्या बॅनर अंतर्गत शाहरुख खानचा 'डॉन' आणि 'डॉन २' सिनेमे बनवले होते. फरहाननेच या दोन्ही सिनेमांचे दिग्दर्शन केले होते.

गेल्या अनेक दिवसांपासून फरहान आणि शाहरुख मिळून 'डॉन ३' घेऊन येत आहेत अशी चर्चा रंगलेली दिसतेय. चाहते देखील गेल्या काही वर्षापासून 'डॉन ३' ची वाट पाहतायत हे वेगळं सांगायला नको.

यादरम्यान बातमी समोर आली आहे की फरहान अख्तर लवकरच नव्या सिनेमाची घोषणा करणार आहे.

हेही वाचा: ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

ट्रेड अॅनलिस्ट सुमित कडेलने ट्वीट करत यासंदर्भात सांगितलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की,''एक्सेल एंटरटेन्मेंट उद्या एक मोठी घोषणा करणार आहे. तुम्ही अंदाज लावू शकता का याबाबत?'' हे ट्वीट समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी 'डॉन ३' चे नाव घेण्यास सुरुवात केली आहे.

काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की जर 'डॉन ३' बनणार असेल तर आमचं अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होईल. तर काहीं शाहरुखच्या चाहत्यांनी इच्छा व्यक्त केली आहे की. 'डंकी' नंतर त्यांना थेट 'डॉन ३' पहायला मिळो. सुमितने आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये हिंट देत म्हलं आहे की, ''एका फ्रॅंचाइजीचा हा तिसरा भाग असणार आहे''. यामुळे तर चर्चेला उधाण आलं आहे.

शाहरुख खानचा 'पठाण' सिनेमा २५ जानेवारी २०२३ रोजी रिलीज होत आहे. या सिनेमात दीपिका पदूकोण,जॉन अब्राहम,डिंपल कपाडिया,आशुतोष राणा सोबत अेनक स्टार्स असणार आहेत. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. यश राज फिल्म्सच्या प्रॉडक्शन अंतर्गत हा सिनेमा बनवण्यात आला आहे.

'पठाण' सिनेमा व्यतिरिक्त शाहरुख खान साऊथ सिनेमांचा प्रसिद्ध दिग्दर्शक एटलीच्या 'जवान' सिनेमात आणि राजकुमार हिरानीच्या 'डंकी' सिनेमात दिसणार आहे.

हे दोन्ही सिनेमे २०२३ मध्ये रिलीज होणार आहेत. आता पहायचं जो 'डॉन ३' ट्रेन्ड होत आहे तो खरंच प्रेक्षकांना आता काही दिवसांत पहायला मिळेल की त्यासाठी आणखी काही वर्ष वाट पहावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT