Dono BO Collection Esakal
मनोरंजन

Dono BO Collection: बापानं 'गदर' मधून कमावले कोट्यावधी मात्र लेकाच्या चित्रपटाचं पहिल्याच दिवशी निघालं दिवाळं!

Vaishali Patil

Dono BO Collection: बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गदर 2' ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. सनी अन् अमिषाच्या जोडीनं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड केले.

तर आता सनी देओलचा मुलगा राजवीर देओल आणि पूनम ढिल्लनची मुलगी पलोमा ढिल्लन यांचा दोनो हा सिनेमा 6 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. दोघांना या चित्रपटाकडून खुप अपेक्षा होत्या.

मात्र बॉक्स ऑफिस वरील आकड्यावरुन हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नसल्याचे दिसत आहे. सनीच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी जसे भरभरून प्रेम दिले तसे प्रेम सनीचा मुलागा राजवीर देओलला प्रेक्षकांकडून मिळत नाहीये. राजवीरचा डेब्यू चित्रपट 'दोनो' बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी फ्लॉप झाला आहे.

सूरज बडजात्याचा मुलगा अवनीश बडजात्या दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या अपेक्षेपेक्षा खुप कमी कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 35 लाखांची कमाई केली आहे.

तर दुसरीकडे केआरकेने ट्विट करून लिहिले, 'सनी देओलच्या मुलाचे दोन्ही चित्रपट फ्लॉप झाले आहेत. या चित्रपटाची शुक्रवारी फक्त 90, शनिवारी फक्त 42 आणि रविवारी फक्त 43 तिकिटे विकली गेली. मला खात्री आहे की फक्त निर्मात्यांनी ही तिकिटे विकत घेतली असतील.

बॉक्स ऑफिसकडे पाहिलं तर 'दोनो' या चित्रपटासोबत अक्षय कुमारच्या 'मिशन राणीगंज' आणि भूमी पेडणेकरच्या 'थँक यू फॉर कमिंग' हे सिनेमे रिलीज झाले आहे.

तर अक्षयचा 'मिशन राणीगंज' चित्रपट देखील प्रेक्षकांना आवडलेला नाही. या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 2.80 कोटींची कमाई केली. तर 'Thank You For Coming' ने चित्रपटाने 80 लाख रुपये कमावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT