Dr. amol kolhe marathi movie shivpratap garudzep released  sakal
मनोरंजन

मराठी स्वाभिमानाचा अंगार.. अमोल कोल्हे यांच्या 'शिवप्रताप'चा टीझर आऊट..

डॉ. अमोल कोल्हे यांचा 'शिवप्रताप गरुडझेप' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

नीलेश अडसूळ

shivpratap : रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करणारा डॉ. अमोल कोल्हे यांचा 'शिवप्रताप गरुडझेप' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवणारा 'टिझर' आज प्रदर्शित झाला आहे. (Dr. amol kolhe marathi movie shivpratap garudzep released) (shivpratap marathi movie)

शिवछत्रपती आणि स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकांनी जगभरात लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील भूमिकांमुळे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज म्हटलं की डॉ. कोल्हे यांचंच नाव प्रेक्षकांच्या मनात ठसलं आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाची महती सांगणारा 'शिवप्रताप' मालिकेतील 'गरुडझेप' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज या चित्रपटाचा 'टिझर' प्रदर्शित झाला असून या भव्यदिव्य चित्रपटाची झलक व धारदार संवादाची प्रचिती दिसून येते. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची अटक, औरंगजेबाच्या दरबारातील बाणेदार प्रसंगाबरोबरच त्यांचे चातुर्य, शौर्याचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत होणार आहे.

'जगदंब क्रिएशन' प्रस्तुत करीत असलेल्या डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वतः डॉ. कोल्हे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

Ashadhi Wari: पंढरपूरला चातुर्मासात रोज कीर्तनाची साडेतीनशे वर्षांची परंपरा

Flight Cancelled : तीन तासांची प्रतीक्षा अन् विमान रद्द

SCROLL FOR NEXT