Dr. tatyarao lahane Thanks to Avinash Narkar, what happened? SAKAL
मनोरंजन

Dr. Tatyarao Lahane: डॉ. तात्याराव लहानेंनी मानले अविनाश नारकर यांचे आभार, असं काय घडलं? बघा

तात्याराव लहानेंनी मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर यांचे आभार मानले आहेत

Devendra Jadhav

Dr. Tatyarao Lahane Thanks to Avinash Narkar News: डॉ. तात्याराव लहाने यांची वेगळी ओळख सांगायला नको. तात्याराव लहाने हे मुंबईतील जे जे हॉस्पिटलमधील नेत्रविभाग कक्षाचे प्रमुख.

तात्याराव लहाने यांनी आजवर त्यांच्या कारकिर्दीत असंख्य ऑपरेशन्स केली. आता तात्याराव लहानेंनी मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर यांचे आभार मानले आहेत. कारण सुद्धा तसंच खास आहे.

(Dr. tatyarao lahane Thanks to Avinash Narkar, what happened?)

अविनाश नारकर यांनी नुकताच पत्नी आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि डॉ. तात्याराव लहाने यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला. हा फोटो पोस्ट करून अविनाश नारकर यांनी महत्वाची माहिती दिली. अविनाश यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं.

डॉ. तात्याराव लहानेंनी हे ऑपरेशन केलं. हा फोटो पोस्ट करून अविनाश यांनी त्यांच्या प्रकृतीसंबंधी महत्वाची अपडेट शेअर केलीय.

अविनाश लिहितात... जय हरि विठ्ठल..! आज आषाढी एकादशीच्या दिवशी या पांडुरंगाच्या हस्तस्पर्षाने माझ्या दृष्टीची स्पष्टता वाढली...!! विठ्ठल विठ्ठल असं कॅप्शन लिहीत अविनाश यांनी हि माहिती शेअर केलीय.

अविनाश यांनी हि पोस्ट लिहिताच त्यांच्या सर्व फॅन्सनी काळजी घेण्याचा सल्ला दिलाय. डॉ. तात्याराव लहानेंनी अविनाश यांना नवी दृष्टी दिली असंच म्हणावं लागेल.

अविनाश यांनी हि पोस्ट लिहिताच डॉ. तात्याराव लहानेंनी सर्वांसमोर त्यांचे आभार मानले आहेत. तात्याराव लिहितात..

आदरणीय अविनाशजी मी आपल्या विश्वासास पात्र ठरलो याचा मला आनंद झाला. मी आपला व सर्व मित्रांचा ऋणी आहे. अशी पोस्ट करत डॉक्टरांनी अविनाश यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान तात्याराव लहानेंनी जे जे हॉस्पिटलचा नेत्रचिकित्सा विभागाशी संलग्न नाहीत. त्यांनी राजीनामा दिलाय. अविनाश नारकर अलीकडेच फकाट सिनेमात झळकले. याशिवाय सध्या ते कन्यादान मालिकेत अभिनय करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : वैद्यकीय एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेश पहिली यादी २५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT