Dream Girl 2 BO Collection Day 3: 
मनोरंजन

Dream Girl 2 BO Collection Day 3: दिल का टेलिफोन..! 'ड्रीम गर्ल 2' ने तीन दिवसातच केली बजेटच्यावर कमाई..

Vaishali Patil

Dream Girl 2 BO Collection Day 3: आयुष्मान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल 2' हा सिनेमा 25 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर रिलिज झाला आणि तीन दिवसातच या सिनेमाने तुफान कमाई करण्यास सुरुवात केली. सनी देओलच्या 'गदर 2' आणि 'OMG 2' या बिग सिनेमांना आयुष्मानचा 'ड्रीम गर्ल 2' हा सिनेमा चांगलीच टक्कर देतोय.

कॉमेडी-ड्रामा असलेल्या 'ड्रीम गर्ल 2' ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग देत वीकेंडला तगडी कमाई केली. 'ड्रीम गर्ल 2' ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी जोरदार कलेक्शन करत बजेटच्या वर कमाई केली आहे.

पूजाच्या भूमिकेत आयुष्मान खुरानाने एंट्री मारली आणि पुन्हा 'दिल का टेलिफोन' वाजला. या चित्रपटात चाहत्यांना आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांचा ऑनस्क्रीन रोमान्स पहिल्यांदाच पाहायला मिळाला. या सिनेमाने तीन दिवसात 40 कोटींचा टप्पा पार केला आहे.

'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी एकूण 10.69 कोटींची कमाई केली होती. शनिवारी 14.02 च्या आसपास कमाई केली.

तर Sanlik.com च्या रिपोर्टनुसार, एकता कपूरच्या बॅनरखाली बनलेल्या 'ड्रीम गर्ल 2' ने रविवारी सर्वाधिक कमाई करत रविवारी म्हणजे तिसऱ्या दिवशी 16 कोटींचा गल्ला जमावला आहे.

या कमाईबरोबर देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 'ड्रीम गर्ल 2'चे एकूण कलेक्शन वीकेंडलाच 40 कोटींवर गेले आहे. तर चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 34 कोटींची कमाई केली आहे. केवळ 35 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे.

राज शांडिल्य दिग्दर्शित हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'ड्रीम गर्ल 2' चा सिक्वेल आहे. ड्रीम गर्ल 2 मध्ये आयुष्मान-अनन्या व्यतिरिक्त, परेश रावल, अनु कपूर, विजय राज, राजपाल यादव आणि अभिषेक बॅनर्जी हे कलाकार मनोरंजन करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT