Salman Khan  Esakal
मनोरंजन

Salman Khan: हिच्यामुळे सलमान इतके वर्ष होता बिनलग्नाचा! शेवटी केलाच खुलासा! व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

सध्या मनोरंजन विश्वात सलमान खानचा चित्रपट 'किसी का भाई किसी की जान'या चित्रपटाचीच चर्चा रंगली आहे. आज हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटानिमित्त सर्वच कलाकार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यातच आता आयुष्मान खुरानाच्या लोकप्रिय चित्रपट 'ड्रीम गर्ल 2'च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा नवीन टीझर रिलीज केला आहे. वास्तविक, आयुष्मानच्या टीझरमध्ये आयुष्मान सलमान खानशी बोलताना दिसत आहे.

काही तासांपूर्वी, ईदच्या निमित्ताने, ड्रीम गर्ल 2 चा नवीन टीझर आयुष्मान खुरानाने शेअर केला आहे.ज्यामध्ये तो सलमान खानशी बोलताना दिसत आहे.

या टिझरमध्ये आयुष्मान साडी परिधान केली आहे. या व्हिडिओत आयुष्मान मुलीच्या आवाजात सलमान खानशी कॉलवर बोलत आहे. यावेळी त्याच्यात खुपच मनोरजंक संवादही झाला आहे.

यात पुजा बोलतांना दिसते की, हॅलो मी पुजा बोलतेय. तुम्ही कोण? ती सलमानला भाईजान म्हणुन उल्लेख करते.

यावर तो म्हणतो. "भाई, मी इतरांसाठी आहे, तुझ्यासाठी मी फक्त जान आहे.. तुझ्या प्रेमात अजूनही मी अविवाहित आहे आहे, मी जरासंही लग्न केलं नाही... मी ऐकले आहे की यावेळी ईदला पूजा होईल,"

हा प्रोमो शेअर करताना आयुष्मानने कॅप्शनमध्ये लिहिले, 'अपनी जान के साथ ईद देने आई है पूजा ड्रीमगर्ल. तुम्ही त्यांचे स्वागत करणार नाही का? #DreamGirl2 7 जुलै 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल."

ड्रीम गर्ल 2 चा हा तिसरा प्रमोशनल व्हिडिओ आहे. यापुर्वी पुजा ही पठाणच्या शाहरुखसोबत आणि त्यानंतर तु झूठी मैं मक्कार मधील रणबीरसोबतही बोलली आहे. ज्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. तर या व्हिडिओमधील भाईजान आणि पूजा यांच्यातील मजेदार संभाषणाने चाहत्यांची मनं जिंकली आहे. त्याचबरोबर चाहतेही चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

बालाजी टेलिफिल्म्स ड्रीम गर्ल 2 हा आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्ल या 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या यशस्वी चित्रपटाचा पुढचा भाग आहे. ड्रीम गर्ल हा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला. तर आत दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. या दुसऱ्या भागात अनन्या पांडे, अन्नू कपूर, परेश रावल, असरानी, ​​मनजोत सिंग आणि विजय राज असे कलाकार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT