Dream Girl 2 Teaser: आयुष्मान खुराना लेहेंग्यात..'पठाण'ही पडलाय प्रेमात ... नेमकी भानगड काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dream Girl 2 Teaser

Dream Girl 2 Teaser: आयुष्मान खुराना लेहेंग्यात..'पठाण'ही पडलाय प्रेमात ... नेमकी भानगड काय?

'ड्रीम गर्ल' हा आयुष्मान खुरानाचा चित्रपटाने सर्वांनाच वेड केलं होतं. या चित्रपटाला प्रेक्षकांच भरभपूर प्रेम मिळालं. तेच पाहता आता आयुष्मान पुन्हा या पुजेच्या भूमिकेत परत येत आहे. त्याचा 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

'ड्रीम गर्ल 2' चा नवीन टीझर नुकताच रिलीज झाला आहे, जो पाहिल्यानंतर हा चित्रपट तुमंचं किती मनोरंजक करणार आहे याती कल्पना तुम्हाला येइलचं. विशेष म्हणजे यात तुम्हाला 'पठाण' कनेक्शनही पाहता येणार आहे. या चित्रपटाच्या टीझरसोबतच निर्मात्यांनी 'ड्रीम गर्ल 2' ची रिलीज डेटही जाहीर केली आहे.

ड्रीम गर्ल 2 च्या टीझरमध्ये आयुष्मान खुराना किंवा कोणत्याही अभिनेत्याचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही, मात्र त्याचा आवाज आणि त्याची छोटीशी झलक पाहिल्यानंतर तो आयुष्मानच आहे हे स्पष्ट होते.

टीझरवरून दिसतयं की पूजाने आता कॉल सेंटरमध्ये काम करणं बंद केले आहे. तो लेहेंगा-चोली घालून बेडवर बसलेला असतो. तितक्यात त्याचा फोन वाजतो. त्यांनतर तो 'पठाण'सोबत फोनवर बोलताना दिसत आहे. 'पूजा' आणि 'पठाण' यांच्यातील खोडसर चर्चाही ऐकायला मिळात आहे.

टीझरमध्ये पूजाचा फोन वाजतो आणि ती फोन उचलते आणि म्हणते- हॅलो, मी पूजा बोलतेय. तिथून एक व्यक्ती शाहरुखच्या आवाजात म्हणतो की तो 'पठाण' आहे. मग 'पूजा' विचारते, माझा पठाण कसा आहेस? मग तो माणूस 'पूजा'ला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देतो आणि म्हणतो की तो आता पूर्वीपेक्षा श्रीमंत आहे.

Dream Girl 2 Teaser

Dream Girl 2 Teaser

'ड्रीम गर्ल 2' 7 जुलै 2023 रोजी रिलीज होणार आहे. आयुष्मान खुराना व्यतिरिक्त अनन्या पांडे, असरानी, ​​परेश रावल, राजपाल यादव, विजय राज, सीमा पाहवा, मनजोत सिंग, मनोज जोशी आणि अभिषेक बॅनर्जी देखील या चित्रपटात दिसणार आहेत. विजय राज, अभिषेक आणि मनजोत सिंग हे देखील 'ड्रीम गर्ल'च्या पहिल्या भागाचाच एक भाग होते.