dream girl 2 Esakal
मनोरंजन

Dream Girl 2 Trailer: मांग भरने के लिए पुरा मोहल्ला पडा है, लेकिन बिल भरने... ड्रीम गर्ल २ ट्रेलर हसून करेल वेडं

'ड्रीम गर्ल 2' चा ट्रेलर रिलिज करण्यात आला आहे. अभिनेता आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे चित्रपटात मुख्य भुमिकेत आहेत.

Vaishali Patil

Dream Girl 2 Trailer: बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचे चाहते गेल्या काही दिवसापासून त्याच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'ड्रीम गर्ल 2' ची वाट पाहत होते.खुप प्रतिक्षेनंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला.

हा ट्रेलर रिलिज झाल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकताही द्विगुणित झाली आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा आयुष्मान पूजाच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

तीन मिनिटाच्या या ट्रेलरमध्ये आयुष्मान खुरानाने पुजाचं पात्र खुपच उत्तमरित्या साकारल्याचं दिसतयं. तो चाहत्यांना पोट धरुन हसवण्यात यशस्वी झाला आहे.

यावेळी चित्रपटाच्या कथेत बराच बदल आहे. पुर्वीच्या कथेपेक्षा यात प्रेक्षकांना वेगळ्या रुपात पूजा दिसणार आहे. यावेळी अनन्या पांडे आयुष्मानसोबत रोमान्स करताना दिसत आहे.

अनन्या पांडे चित्रपटात वकिलाच्या भूमिकेत आहे. तिलाआयूष्यमानसोबत लग्न करायचं आहे. तिचे वडील आयुष्मानसमोर एक अट ठेवतात ज्यामुळे आयुष्यमानला पुन्हा एकदा पूजाच्या रुपात यावं लागतं. त्यानंतर खरा खेळ सुरु होतो.

पहिल्या ड्रिम गर्लमध्ये आयुष्मान खुरानासोबत नुसरत भरुचा दिसली होती, मात्र यावेळी तिच्या ऐवजी अनन्या पांडे या चित्रपटात दिसणार आहे. दोघांशिवाय विजय राज, मनजोत सिंग, अभिषेक बॅनर्जी, अन्नू कपूर आणि राजेश शर्मा यांसारखे कलाकार आहेत जे 'ड्रीम गर्ल'मध्ये दिसले होते. तर आता अनन्या पांडे आणि परेश हे नवे चेहरे चित्रपटात पहायला मिळणार आहे.

काही तासातच ट्रेलरला मिलियनच्या पार व्ह्यूज मिळाले आहेत. हा चित्रपट 2019 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट ड्रीम गर्लचा सिक्वेल आहे. एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी चित्रपटाती निर्मिती केली तर राज शांडिल्य दिग्दर्शिन केलं आहे. हा 25 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT