Drishyam 3 Update Google
मनोरंजन

Drishyam 3 साठी अजय देवगणनं घातली 'ही' अट.. म्हणाला,'मोहनलालचा 'दृश्यम 3' जेव्हा शूट होईल तेव्हा..'

'दृश्यम' हा ओरिजनली मल्याळम सिनेमा आहे,ज्यात मोहनलालनं मुख्य भूमिका साकारली आहे. हिंदीतही अजयच्या दृश्यमनं दोन्ही भागांवर बक्कळ कमाई केली आहे,

प्रणाली मोरे

Drishyam 3 Update: बॉलीवूड अभिनेता अजय देवगण एकमेव अभिनेता आहे ज्याच्या साऊथ रिमेक सिनेमांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे आणि त्याच्या रीमेक सिनेमांनी बॉक्सऑफिसवर तगडी कमाई केली आहे.

'दृश्यम' च्या पहिल्याच नाही तर दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. त्यामुळेच आता सिनेमाच्या तिसऱ्या भागाच्या निर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीवरनं समोर आलं आहे की 'दृश्यम'च्या हिंदी आणि मल्याळम भाषेतील सिनेमांना एकत्र शूट केलं जाईल.

खरंतर ओरिजनली हा सिनेमा मल्याळम भाषेतील आहे. सुरुवातीला याचे हिंदीतील दोन भाग हे नंतर शूट केले गेले पण यावेळी मात्र असं होणार नाही.

'दृश्यम 3' चं हिंदी आणि मल्याळम भाषेतील शूटिंग एकाच वेळेस केलं जाणार आहे. (Drishyam 3 Update Ajay Devgn mohanlal)

जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिनेमाविषयी हा मोठा निर्णय घेण्यात येणार आहे आणि असं अजय देवगणनं सूचवलं आहे. अजय देवगणला वाटतं की जेव्हा सिनेमा रिलीज होईल तेव्हा तो हिंदी प्रेक्षकांसाठीही फ्रेश रहावा.

असं पाहिलं गेलं आहे की जेव्हा एखादा रीमेक सिनेमा रिलीज होणार असतो तेव्हा आधीच अनेकदा त्याचं ओरिजनल व्हर्जन पाहिलेलं असतं आणि हिंदी व्हर्जनच्या प्रेक्षकांसाठी सिनेमात मग नाविन्य उरत नाही.

त्यामुळे सिनेमाला दोन्ही भाषेत एकत्र शूट करण्याची आणि रिलीज करण्याची तयारी होत आहे. अजयनं अशी अट ठेवल्यामुळे निर्मात्यांना आता हा निर्णय घेणं भाग पडतंय अशी देखील एक चर्चा इंडस्ट्रीत सुरू झाली आहे.

अजय देवगण 'दृश्यम'च्या दोन्ही भागांना मिळालेल्या यशानं खूप खूश आहे. सिनेमाच्या पहिल्या दोन भागांनी त्याला चांगलाच आत्मविश्वास दिला आहे. आणि अशात तो सिनेमाच्या तिसऱ्या भागाला घेऊन खूपच आशावादी आहे.

सिनेमाच्या दुसऱ्या भागानं जगभरात बक्कळ कमाई केली आणि जवळपास ३५० करोडचं कलेक्शन करुन दिलं. आता चाहत्यांना 'दृश्यम'च्या तिसऱ्या भागाची प्रतिक्षा आहे.

सध्या हिंदी 'दृश्यम' सिनेमातील मुख्य कलाकार अजय देवगण आणि तब्बू हे आपल्या 'भोला' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. 'भोला' सिनेमात पुन्हा हे दोघे एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.

नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि चाहत्यांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया यावर पहायला मिळाल्या.

सिनेमा ३० मार्च,२०२३ रोजी रिलीज केला जाणार आहे. या सिनेमात तब्बू,अजय व्यतिरिक्त दीपक दोबरियाल,संजय मिश्रा आणि गजराज राव यांच्या मु्ख्य भूमिका असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

APL 2025: ६,६,६,४,४,४... पी अर्जुन तेंडुलकरचा १२ चेंडूत धुमाकूळ! स्फोटक फलंदाजीनं वेधलं लक्ष

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: अनिलकुमार पवार, वाय एस रेड्डी, सिताराम गुप्ता आणि अरूण गुप्ता यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT