Urmila Nimbalkar  
मनोरंजन

अभिनेत्री उर्मिला होणार आई; फोटो पोस्ट करत दिली 'गुड न्यूज'

स्वाती वेमूल

'संगीत सम्राट' या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकरच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत उर्मिलाने चाहत्यांना गुड न्यूज दिली. '२० आठवडे आणि ६ दिवस प्रेग्नंट' असं कॅप्शन देत उर्मिलाने तिचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये उर्मिलाचा बेबी बंप दिसून येतोय. त्याचसोबत 'हे एप्रिल फूल नाही' असंही तिने गंमतीने म्हटलंय. गरोदरपणातील पाचवा महिना सुरू आहे, असं लिहित तिने आणखी काही फोटो पोस्ट केले आहेत. उर्मिलाने जवळपास आठ वर्षांपूर्वी सुकिर्त गुमस्ते याच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या आठ वर्षांनंतर या दोघांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. 

उर्मिला आणि सुकिर्त यांची एका थिएटर ग्रुपद्वारे पहिल्यांदा ओळख झाली. सुरुवातीला दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. २०१२ मध्ये या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुकिर्त हा पेशाने पत्रकार असून एका पब्लिकेशनसाठी तो काम करतो. 

उर्मिलाने अभिनेत्री आणि त्यानंतर युट्यूब कंटेट क्रिएटर अशी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. प्रवास, लाइफस्टाइल, फॅशन यांसारख्या विषयांवर ती आणि तिचा पती मिळून व्हिडीओ बनवत असतात. सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडीओला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. उर्मिलाने 'दुहेरी' या मराठी मालिकेत भूमिका साकारली होती. तिने काही हिंदी मालिकांमध्येही काम केलंय. दिया और बाती हम, मेरी आशिकी तुमसे ही यांसारख्या मालिकेत ती झळकली. त्यानंतर उर्मिलाने 'संगीत सम्राट' या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन गायक रोहत राऊतसोबत मिळून केलं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hanumant Pawar Threat Allegation : हनुमंत पवारांकडून धमक्या व शिवीगाळ; हिंदुत्ववादी तुषार दामगुडे यांचा आरोप, “संविधानाच्या चौकटीत लढणार”

India vs Pakistan सामना १४ जूनला! ICC च्या निर्णयाने सर्वांना झटका; १२ संघांचा समावेश असलेल्या मोठ्या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक

Dombivli News: प्रवाशाची झडती, रिक्षात धारधार शस्त्रे अन्...; डोंबिवलीत संशयास्पद ऑटो चालक ताब्यात, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : तळोज्यात १ कोटींच्या अमली पदार्थांवर पोलिसांची कारवाई; दोघे जेरबंद

IND vs AUS: स्मृती मानधनाला हरमनप्रीत ऐवजी अचानक का करावं लागलं टीम इंडियाचं नेतृत्व? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT