shah rukh khan dunki movie box office collection day 2  SAKAL
मनोरंजन

Dunki Box Office: शाहरुखच्या 'डंकी'चा डंका वाजलाच नाय! प्रभासच्या सालारसमोर काही केल्या टिकेना! दुसऱ्या दिवशी किती कोटी कमावले?

'डंकी' 21 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.

Vaishali Patil

Dunki Box Office Collection Day 2:  बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसाठी यंदाचे वर्ष खुपच खास ठरले आहे. या वर्षी त्याचे दोन सिनेमे बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले. यात एक होता 'पठाण'तर दुसरा होता 'जवान'.

'पठाण' आणि 'जवान' नंतर या वर्षी प्रदर्शित होणारा शाहरुख खानचा 'डंकी' हा तिसरा चित्रपट आहे. दोन्ही सिनेमांप्रमाणेच या चित्रपटाकडूनही प्रेक्षकांना खुपच अपेक्षा होत्या.

'डंकी' 21 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि आता कमाईचे आकडे पाहता हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नसल्याचे चित्र आहे.

राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकी या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा होती, परंतु आता डंकीचे कलेक्शन पाहता चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.

शाहरुख खानचा चित्रपट डंकीने पहिल्या दिवशी केवळ 30 कोटींची कमाई केली. तर वीकेंडला चित्रपटाची कमाई वाढेल अशी अपेक्षा निर्मात्यांना होती. मात्र तसं झालेलं नाही प्रभासच्या सालारने डंकीच्या कमाईला ग्रहण लावल्याचे चित्र आहे.

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'डंकी' ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 20 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह 'डंकी'चे दोन दिवसांचे एकूण कलेक्शन आता 49.20 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

तर दुसरीकडे चित्रपटाच्या जगभरातील कमाईबद्दल बोलायचे झाले तर 'डंकी'ने जगभरात 58 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

'डंकी' बद्दल बोलायचे झाले तर हा एक कॉमेडी ड्रामा आहे. या चित्रपटात शाहरुख व्यतिरिक्त तापसी पन्नू, विक्की कौशल, बोमन इराणी, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले असून अभिजात जोशी आणि कनिका धिल्लन यांनी एकत्र लिहिले आहे. चित्रपटाची कथा अशा लोकांची आहे जे तेही चुकीच्या मार्गाने आपला देश सोडून परदेशात कमाईसाठी जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna Crime : मंठा तालुक्यात अनैतिक संबंधाच्या संशयातून अमानुष खून

Nashik News : ‘रोजंदारी’ की ‘कायम’? प्रशासनाच्या चुकांमुळे आंदोलन चिघळले

Latest Maharashtra News Updates: चार दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर

Digital Detox Before Bed: झोपण्याच्या तासभर आधी मोबाइल का ठेवावा दूर? मेंदूतज्ज्ञ देतात सोपे आणि परिणामकारक उपाय

Chh. Sambhajinagar Crime : मातेने केली चिमुकल्याची विक्री, दहा हजारात झाला व्यवहार; दुसऱ्या पतीसोबत केले पलायन

SCROLL FOR NEXT