Dunki Box Office Collection Day 3:  Esakal
मनोरंजन

Dunki Box Office : 'डंकी'च्या रस्त्यात 'सालार' नावाचं वादळ! तिसऱ्या दिवशी कमाईचा आकडा किती?

शाहरुखच्या डंकी या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला.

Vaishali Patil

Dunki Box Office Collection Day 3: बॉलिवूडचा किंग शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या डंकी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'पठाण' आणि 'जवान' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर चाहत्यांना डंकी सिनेमाकडून खुप अपेक्षा होत्या. मात्र वर्षाच्या अखेरीस रिलिज झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचे खास प्रेम मिळालेले नाही.

शाहरुखच्या डंकी या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. 'डंकी'चे आत्तापर्यंतच्या कलेक्शनचे आकडे खुपच कमी आहे. त्यामुळे आता पाहिल्यानंतर राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकी हा चित्रपट जवान-पठाणचा विक्रम मोडू शकणार नाही असं वाटत आहे.

आता चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. Sacknilk च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 29.2 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

चित्रपटाने पहिल्या दिवशी 29 कोटी तर दुसऱ्या दिवशी 20 कोटींची कमाई केली होती. यासह 'डंकी'चे तीन दिवसांचे एकूण कलेक्शन आता 75.32 कोटींवर पोहोचले आहे.

शाहरुख खान, विकी कौशल, तापसी पन्नू आणि बोमन इराणी स्टारर 'डंकी' या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

प्रभासच्या 'सालार' चित्रपटाचा परिणाम शाहरुख खानच्या 'डंकी' या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झाल्याचे दिसत आहे. प्रभासचा सालार 22 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. तर सालारने दोन दिवसातच शंभर कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे आता शाहरुख खानचा डंकी किती कोटींचा गल्ला जमवू शकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT