Dunki Drop 5 Shah Rukh Khan Movie O Maahi Teaser viral :  esakal
मनोरंजन

Dunki Drop 5: 'ओ माही' ची झलक सबसे अलग , किंग खानचा हटके स्वॅग! शाहरुखचा पुन्हा मोठा धमाका

किंग खान शाहरुखचा डंकी हा प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला आहे. आता शाहरुखचा चित्रपट म्हटल्यावर त्याची चर्चा तर होणारच.

युगंधर ताजणे

Dunki Drop 5 Shah Rukh Khan Movie O Maahi Teaser viral : किंग खान शाहरुखचा डंकी हा प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला आहे. आता शाहरुखचा चित्रपट म्हटल्यावर त्याची चर्चा तर होणारच. यंदाचे वर्ष शाहरुखसाठी कमालीचे लाभदायी गेले आहे. त्याचा या वर्षी जानेवारीमध्ये पठाण प्रदर्शित झाला होता. त्यानंतर जवान आला या दोन्ही चित्रपटांनी हजारो कोटींची कमाई केल्याचे दिसून आले आहे.

आता शाहरुख प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासोबत डंकीमध्ये दिसणार आहे. तो पहिल्यांदाच हिरानी यांच्या चित्रपटात काम करणार आहे. विदेशात जाण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुणांची कथा या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केला आहे. ज्याच्या यापूर्वीच्या टीझर, ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता त्याचा पाचवा ड्रॉप मेकर्सनं प्रदर्शित केला आहे.

डंकीची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा असून पठाण, जवान प्रमाणेच हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय ठरणार असे बोलले जात आहे.त्यातील ओ माही वे गाण्यातील किंग खानचा लूक तुफान लोकप्रिय होताना दिसतो आहे. तो पाहून नेहमी प्रमाणे शाहरुखच्या चाहत्यांनी त्यावर मोठ्या संख्येनं प्रतिक्रिया दिल्या आहेत. शाहरुखच्या त्या रोमँटिक अंदाजानं चाहते भारावून गेले आहेत.

तीन दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं आणि स्टाईलनं चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या शाहरुखचा देशातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये समावेश होतो. त्याच्या चाहत्यांची संख्याही प्रचंड आहे. केवळ भारतच नाही तर विदेशातही किंग खानचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. अशातच त्याच्या डंकी नावाच्या नव्या चित्रपटाची चर्चा आहे. सध्या त्याच्या डंकीतील ओ माही गाण्यानं प्रेक्षकांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे.

शाहरुख पोस्ट शेयर करुन म्हटलं आहे की, सगळेजण विचारत आहेत म्हणून सांगतो की, डंकीचा अर्थ आपल्या माणसांपासून लांब राहणे...आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला शक्य तितकं सहकार्य करणं, ओ माही ओ माही....तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप सारं प्रेम...अशा शब्दांत शाहरुखनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

डंकीच्याबाबत सांगायचे झाल्यास राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यात शाहरुख शिवाय विकी कौशल, तापसी पन्नु आणि बोमन इराणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT