Shahrukh khan film dunki trailer out fans impressed esakal
मनोरंजन

Dunki Trailer Review : 'इंग्रजांना कुणी नाही विचारलं तुम्हाला हिंदी येतं का, मग आपल्याच...' शाहरुखच्या डंकीनं उभा केला मोठा प्रश्न

किंग शाहरुखच्या डंकी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

युगंधर ताजणे

Shahrukh khan film dunki trailer out fans impressed : किंग शाहरुखच्या डंकी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या ट्रेलरची चर्चा रंगली होती. राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकीची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. ट्रेलरमधील त्या एका संवादानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या वर्षी पठाण, जवान मधून धमाकेदार एंट्री करणाऱ्या शाहरुखच्या दोन्ही चित्रपटांनी मिळुन हजार कोटींचा टप्पा गाठला आहे. पठाणनं हजार कोटींची कमाई केली होती. दुसरीकडे जवाननं सहाशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. या सगळ्यात आता चाहत्यांना उत्सुकता आहे ती त्याच्या डंकी नावाच्या चित्रपटाची.

डंकी च्या निमित्तानं शाहरुख आणि राजकुमार हिरानी हे पहिल्यांदाच एकत्रित काम करणार आहे. २०२३ मधील सर्वाधिक चर्चेतील फिल्म म्हणून डंकीच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. डंकी मध्ये किंग खानसोबत पहिल्यांदाच तापसी पन्नु, विकी कौशल प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरचं अनेक समीक्षकांनी कौतुक केलं आहे. भारतातील काही राज्यांमध्ये अवैध मार्गानं परदेशी जाणाऱ्यांचे प्रमाण फार आहे त्यातील निवडक गोष्टींवर प्रकाशझोत टाकण्याचे काम या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

डंकीमधील त्या चार तरुणांना काही करुन लंडनमध्ये जायचं आहे. तिथं जाऊन पैसा कमवायचा आहे. तिथेच सेटल व्हायचे आहे. पण या सगळ्यात अडचण आहे ती भाषेची. त्यांना इंग्रजी येत नाही. ती यावी म्हणून ते प्रयत्न करतात. या दरम्यान त्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागते. तो प्रवास दिग्दर्शकानं डंकीच्या माध्यमातून मांडला आहे. त्याचवेळी त्या संवादानं लक्ष वेधून घेतले आहे.

शाहरुख तापसी पन्नुला म्हणतो, इतक्या वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं. ते जेव्हा भारतात आले तेव्हा आपण त्यांना विचारले नाही की तुम्हाला हिंदी येते का म्हणून, पण आपल्याला जेव्हा त्यांच्या देशात जाण्याची वेळ येते तेव्हा मात्र तुम्हाला इंग्रजी यायलाच हवी. असे का... हा प्रश्न शाहरुख विचारतो. सोशल मीडियावर या संवादानं लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT