Shah Rukh Khan Dunki  esakal
मनोरंजन

Dunki On OTT : शाहरुखचा 'डंकी' ओटीटीवर रिलीज झाला! किंग खाननं 'व्हॅलेंटाईन'चं चाहत्यांना दिलं मोठं गिफ्ट

किंग खाननं व्हॅलेंटाईनच्या (Dunki On OTT) निमित्तानं चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. त्याचा डंकी नावाचा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Shah Rukh Khan Dunki OTT Release: किंग खान शाहरुखनं त्याच्या चाहत्यांना व्हॅलेंटाईनच्या निमित्तानं चाहत्यांना आगळं वेगळं गिफ्ट दिलं आहे. त्याचा बहुचर्चित असा डंकी नावाचा चित्रपट हा ओटीटीवर प्रदर्शित (Shah Rukh Khan News) झाला आहे. गेल्या वर्षी शाहरुखचे जेवढे चित्रपट प्रदर्शित झाले ते सर्व ओटीटीवर आल्यानं चाहत्यांमध्ये वेगळाच आनंद आहे.

मागील वर्षी शाहरुखचा पठाण, जवान आणि डंकी नावाचा चित्रपट (Dunki On Netflix) प्रदर्शित झाला होता. या तीनही चित्रपटांनी चाहत्यांची मोठी पसंती मिळवल्याचे दिसून आले. पठाणनं तर बॉक्स ऑफिसवर तब्बल हजार कोटींची कमाई केली होती. या पाठोपाठ प्रदर्शित झालेल्या जवाननं देखील सातशे कोटींपेक्षा जास्त कमाई करुन आपली वेगळी ओळख चाहत्यांच्या मनात तयार केली.

राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani Movie) दिग्दर्शित डंकी नावाच्या चित्रपटातून शाहरुखनं (Dunki Latest News) आपणच अजून बॉलीवूडचे किंग असल्याचे दाखवून दिले होते. त्या चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. या सगळयात शाहरुखनं आता व्हॅलेटाईनच्या (Valentine Special) निमित्तानं त्याचा डंकी नावाचा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केला आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट त्याच्या चाहत्यांना पाहता येणार आहे.

डंकीमध्ये शाहरुख खानसह तापसी पन्नु, विकी कौशल यांच्या प्रमुख भूमिका असून शाहरुखनं पहिल्यांदाच राजकुमार हिरानी यांच्यासोबत केलेल्या या चित्रपटानं प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. एका वेगळ्या विषयावर भाष्य करत त्याची प्रभावी मांडणी हिरानी यांनी आपल्या चित्रपटातून केली होती. खरं तर बऱ्याच दिवसांपासून चाहत्यांना डंकी ओटीटीवर कधी येणार याची कमालीची उत्सुकता होती.

नेटफ्लिक्सनं त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन डंकी प्रदर्शित झाल्याची माहिती दिली आहे. शाहरुखच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास त्याच्या जवान २ ची चर्चा आहे. त्याच्या सिक्वेलवर काम सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच शाहरुख ऑपरेशन खुखरीमध्ये देखील दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT