Kangana Ranaut Ravan Dahan Esakal
मनोरंजन

Kangana Ranaut: 50 वर्षाचा इतिहासाला कंगनानं दिला तडा; लवकुश रामलीलामध्ये पहिल्यांदाच महिलेने केले रावण दहन!

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कंगना राणौतने 50 वर्ष जुनी परंपरा बदलली. तिने रामलीला मैदानात रावणाचे दहन केले

Vaishali Patil

Kangana Ranaut Ravan Dahan: 24 ऑक्टोबर रोजी देशभरात दसऱ्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. मात्र यावेळचा दसरा कंगनासाठी खुपच खास होता. राजधानी दिल्लीत होणाऱ्या सर्वात मोठ्या लव कुश रामलीलामध्ये कंगना रणौत प्रमुख पाहुणी म्हणुन आली होती. इतकच नाही तर कंगनाने या कार्यक्रमात रावण दहन करुन तब्बल 50 वर्षांचा इतिहास मोडला आहे.

यावेळी दिल्लीच्या लव कुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन सिंह यांनी सागितले की, लाल किल्ल्यावर दरवर्षी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या 50 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेने बाण मारून राक्षसाचा वध केला होता.

मात्र यावेळी चर्चा झाली ती एका घटनेची ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्याच झालं असं की कंगना रामलीला मैदानावर पोहोचण्यापूर्वीच दहनासाठी तयार केलेला रावणाचा पुतळा खाली पडला. त्यानंतर रावणाचा पुतळा पुन्हा उभारण्यात आला, कंगनाने बाण मारुन रावणाचे दहन केले.

यावेळी कंगनाने सांगितले की, देशाचे सर्वात मोठे नायक श्री राम आहेत, त्यांच्या आधी कोणी नव्हते आणि भविष्यातही कोणी नसेल, यासोबत तिने जय श्री राम आणि भारत माता की जय च्या घोषणा दिल्या. सध्या कंगनाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी कंगनाचे कौतुक केले आहे. तर रावण पडल्याच्या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहेत.

यावेळी कंगनाच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले. कंगनाने केशरी रंगाची ब्रोकेड बनारसी साडी परिधान करुन केसात लाल रंगाचा गजराही लावला होता. यासोबतच कंगनाने दागिनेही घातले होते. कंगना या लूकमध्ये खुपच सूंदर दिसत होती. यावेळी कंगनाने तिचा आगामी चित्रपट 'तेजस' चे प्रमोशन केले.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिचा तेजस हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. ज्यात ती भारतीय वायुसेनेच्या पायलटची भूमिका करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : सामनाही गमावला अन् आता BCCIचा कारवाईचा बडगा... हार्दिक पांड्याची दुतर्फा गोची, पुन्हा असं केल्यास बंदी?

स्वरांच्या युगाचा अंत ! आशाताई भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामामात पार पडले अंत्यसंस्कार

ICC चा मोठा धमाका! टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी विक्रमी बक्षीस रकमेची घोषणा; IPL लाही टक्कर देत रकमेत १० पट वाढ

Shahajibapu Patil: तर शिवसेनेचे ५-६ आमदार निवडून येतील: शहाजीबापू पाटील, सोलापूरमध्ये तानाजी सावंत यांना लक्ष घालायला सांगा!

IPL 2026 : टीम डेव्हिडची सर्व 'मस्ती' उतरवली; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अम्पायरने समाजावूनही ऐकला नाही, आता... Video

SCROLL FOR NEXT