Jacqueline Fernandez Google
मनोरंजन

जॅकलिन फर्नांडिसला ईडीने बजावले समन्स

२०० कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणी होणार चौकशी

प्रणाली मोरे

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या(Jacqueline Fernandez) अडचणीत आता वाढ झाली आहे. तिला ८ डिसेंबर रोजी दिल्लीत हजर राहण्याचे ईडीने समन्स बजावले आहे. महागडी जनावरं गिफ्ट घेणं तिला आता महागात पडले आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकारणात जॅकलिनचे नाव समोर आले आहे. मुंबई विमानतळावर ईडीने तिला थांबवले होते. त्यानंतर आता ८ डिसेंबर रोजी दिल्लीत हजर राहण्याचे ईडीने तिला समन्स बजावले आहे. २०० कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणाची आता खोलवर जाऊन चौकशी होणार आहे.

सुकेशने जॅकलिनला कोटींची गिफ्ट्स दिली होती. एका कार्यक्रमासाठी दुबईला जात असताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर काल तिला थांबवले होते. सुकेश चंद्रशेखर (Sukesh ChandraShekhar) याच्या २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची ईडीकडून चौकशी होणार आहे. सुकेश चंद्रशेखर या उद्योगपतीने एकूण ५ जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचं समोर आलं होतं. तिला दिलेल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल ५२ लाख आणि प्रत्येकी ९ लाख रुपये किंमत असलेली अशा एकूण ३६ लाखांच्या ४ पर्शियन मांजरांचाही समावेश आहे.

Jacqueline Fernandez, Sukesh Chandrashekhar

जॅकलीन आणि सुकेशचा एक फोटोदेखील समोर आला आहे. हा फोटो समोर आल्यानंतर जॅकलीन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा करण्यात आला होता. दिल्लीच्या तिहार तुरुंगातून २०० कोटी रुपये वसूल केल्याप्रकरणी ईडीने शनिवारीच आरोपपत्र दाखल केले होते. जॅकलीनला घोडा आणि मांजर गिफ्ट करणारा सुकेश चंद्रशेखर कोण ?हा प्रश्न नक्कीच पडला असेल आपल्या सगळयांना. तर हा सुकेश चंद्रशेखर बंगळुरुतला एक उद्योगपती आहे. सुरुवातीला नोकरी देण्याच्या आमिषाने त्याने अनेकांची फसवणूक केली. ७५ जणांचे १०० कोटी रुपये घेऊन त्याने पोबारा केला. निवडणूक आयोगात ओळख असल्याचं सांगून हवं ते चिन्ह मिळवून देण्याचं आमिष त्यानं दाखवलं. याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी त्याला २०१७ मध्ये अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT