मनोरंजन

डिनो मोरियाची संपत्ती जप्त; ईडीची कारवाई

डिनोसह, संजय खान, डीजे अकील आणि काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई यांचीही संपत्ती जप्त

स्वाती वेमूल

अभिनेता डिनो मोरिया Dino Morea, संजय खान, डीजे अकील आणि काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई यांची संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी जप्त केली. बँक घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. या चौघांच्या संपत्तीची एकूण किंमत ८.७९ कोटी रुपये असल्याची माहिती ईडीने दिली. यामध्ये मालमत्ता, तीन वाहनं आणि इतर बँक अकाऊंट्स, शेअर्स, म्युच्युअल फंड्स यांचा समावेश आहे. जप्त केलेल्या संपत्तीपैकी तीन कोटी रुपयांची मालमत्ता ही संजय खान यांची आहे. तर डिनो मोरियाची १.४ कोटी रुपये आणि डीजे अकील नावाने प्रसिद्ध असलेल्या अकील अब्दुल खलील बचू अलीची संपत्ती १.९८ कोटी रुपये इतकी आहे. अहमद पटेल यांचे जावई इरफान अहमद सिद्दिकी यांची संपत्ती २.४१ कोटी रुपये आहे. (ED seized assets of actor Dino Morea and Ahmed Patels son in law under PMLA Here is why)

"स्टर्लिंग बायोटेक समुहाचे फरार प्रवर्तक नितीन संदेसरा आणि चेतन संदेसरा यांनी त्यांच्या गुन्ह्यातून जे पैसे मिळवले, ते या चार जणांना दिले", असे ईडीने म्हटले आहे. नितीन संदेसरा, चेतन संदेसरा, चेतन यांची पत्नी दिप्ती संदेसरा आणि हितेश पटेल यांना विशेष कोर्टाने फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केलं आहे. हे प्रकरण १४ हजार ५०० कोटी रुपयांच्या कथित बँक घोटाळ्याशी संबंधित आहे.

२०११-१२ मध्ये संदेसरा बंधूंनी आयोजित केलेल्या कौटुंबिक कार्यक्रमात डिनो मोरिया आणि अकील यांनी हजेरी लावली होती आणि तेव्हाच त्यांना गुजरातमधील फार्मास्युटिकल कंपनीने बेकायदेशीरपणे मोबदला दिला, असा दावा करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे ईडीने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi on Trump Tariff: लाल किल्ल्यावरून ट्रम्पच्या टॅरिफला पंतप्रधान मोदींनी दिले उत्तर... 'मोदी दीवार बनकर खडा है'

PM Narendra Modi Speech Live Update : २०४७ मध्ये विकसित भारत होणारच हा प्रथम संकल्प- पंतप्रधान मोदी

PM Modi's Independence Day 2025 Look: पांढरा कुर्ता अन् भगवा फेटा, स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींच्या खास लूकचे फोटो आले समोर

Independence Selfie Tips: स्वातंत्र्यदिनाला घरी, ऑफिसमध्ये तिरंग्यासोबत सेल्फी घेताय? या स्पेशल टिप्समुळे तुमच्या सेल्फीवर होईल likes चा वर्षाव

PM Narendra Modi : तरुणांना १५ हजार रुपये मिळणार....पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा...काय आहे प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना?

SCROLL FOR NEXT