Ed Sheeran in Mumbai  esakal
मनोरंजन

Ed Sheeran in Mumbai : जग गाजवणारा ED शीरन मुंबईच्या शाळेत काय करतोय? मराठी पोरांसोबत घातला धुमाकूळ...

Ed Sheeran in Mumbai : एड शीरन भारतात आला आहे. मंगळवारी त्याने मुंबईतील एका शाळेला भेट देताना एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला.

Sandip Kapde

Ed Sheeran in Mumbai : एड शीरन भारतात आला आहे. मंगळवारी त्याने मुंबईतील एका शाळेला भेट देताना एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला. त्यामुळे त्याची भारतातील चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ED शीरन याने वर्गात विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच त्यांच्यासाठी गाणी गायली. 2024 मध्ये त्याच्या आशिया आणि युरोप टूरचा एक भाग म्हणून 16 मार्च रोजी मुंबईत त्याचा शो होणार आहे.

'शेप ऑफ यू' या गाण्याने जगभरात खळबळ माजवणारा गायक एड शीरन भारतातही धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेला हा गायक मुंबईत पोहोचला आहे.

एड शीरनची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे. 'शेप ऑफ यू' या गाण्यानंतर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर परदेशीच नाही तर देशी चाहत्यांची संख्याही वाढली. हा प्रसिद्ध गायक सध्या मुंबईत आहे. एड शीरनच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो मुंबईतील एका शाळेत मुलांसोबत मस्ती करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये एड शीरन गिटार वाजवताना मुलांसोबत 'शेप ऑफ यू' गाणे म्हणत आहे. त्याचवेळी काही विद्यार्थ्यांनी त्याच्यासाठी एक खास गाणेही गायले, ज्याचा एड शीरनने खूप आनंद घेतला. इतकंच नाही तर त्यांनी तिथल्या मुलांशी आणि शिक्षकांशीही संवाद साधला. गायकाच्या या डाउन टू अर्थ वर्तनाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. चाहत्यांनी एड शीरनचे खूप कौतुक केले आहे. (Latest Marathi News)

एड शीरन एका कॉन्सर्टसाठी मुंबईत आला आहे. 16 मार्च रोजी तो येथे परफॉर्म करणार आहे. मुंबईत परफॉर्म करण्याची त्याची ही दुसरी वेळ असेल. याआधी 2017 मध्ये त्यांचा पहिला कॉन्सर्ट भारतात झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: डोंबिवलीत काँग्रेसला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश, पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंकडून नाराजी उघड

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT