TV Celebs Eid 2023 Esakal
मनोरंजन

TV Celebs Eid 2023: 'गोपी बहू'ने साजरी केली लग्नानंतर पहिली ईद तर इतर कलाकारांचंही दणक्यात सेलिब्रेशन..

Vaishali Patil

रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास केल्यानंतर लोकांनी सण साजरा करण्यासाठी चंद्र पाहिला. आज संपूर्ण देश ईदच्या सेलिब्रेशनमध्ये मग्न आहे. स्टार्सची ईदही नेहमीच खास असते. बॉलिवूड स्टार्सही हा सण मोठ्या थाटात साजरा करतात. टीव्ही स्टार्स आपल्या कुटुंबियांसोबत हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करत आहेत

कलाकारही आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या सेलिब्रेशनची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी शानवाज शेखसोबत लग्नानंतरची पहिली ईद साजरी करत आहे. त्यानेही आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने तिचा सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पिवळ्या रंगाचा ड्रेस आणि पांढरा दुपट्टा यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

त्याबरोबर हिना खान हिने देखील काश्मीरला तिच्या गावीच ईद साजरी केली. तिने तिचे मनाला भिडणारे फोटो शेअर केले आहेत. सोनेरी कुर्ता-पायजमा आणि गुलाबी दुपट्ट्यात हिना खानचे सौंदर्य खुलुन आलं आहे.

फोटोसह हिनाने खास पद्धतीने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिले, “काश्मीरची कळी जन्नत-ए-काश्मीरमध्ये ईद साजरी करत आहे. सर्वांना ईद मुबारक."

'बडे अच्छे लगते हैं 2' फेम नकुल मेहताने ईदच्या निमित्ताने त्याचा फॅमिली फोटो शेअर केला आहे. फोटोसोबत नकुलने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सबका भाई सबकी जान, सूफी जान. ईद मुबारक."

तर बिग बॉस आणि इमली च्या भुमिका करत घराघरात लोकप्रिय झालेली सुंबुल तौकीरने आपल्या नवीन घरात वडील आणि बहिणीसोबत ईद साजरी केली. पिवळ्या सूटमध्ये सुंबुल खूप सुंदर दिसत होती. या छायाचित्रांसह अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

सध्या सोशल मिडियावर सर्वच कलाकारांचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. नेटकरी देखील त्याच्या या पोस्टला कमेंट करत ईदच्या शुभेच्छा दिल्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT