ekda yeun tar bagha marathi movie announcement prasad khandekar onkar bhojane vishakha subedar bhau kadam  SAKAL
मनोरंजन

Ekda Yeun Tar Bagha: मराठमोळ्या कॉमेडीचा तडका, प्रसाद खांडेकरच्या 'एकदा येऊन तर बघा' सिनेमाची घोषणा

प्रसाद खांडेकरच्या आगामी एकदा येऊन तर बघा सिनेमाची घोषणा झाली

Devendra Jadhav

Ekda Yeun Tar Bagha News: काही महिन्यांपूर्वी एकदा येऊन तर बघा या आगामी सिनेमाची घोषणा झाली. हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकर या सिनेमाच्या माध्यमातुन पहिल्यांदा दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे, अशी चर्चा झाली.

आता प्रसाद खांडेकरच्या आगामी एकदा येऊन तर बघा सिनेमाची घोषणा झालीय. या सिनेमात एकसे बडकर एक तगडे कॉमेडी कलाकार झळकणार आहेत.

प्रसाद खांडेकरच्या आगामी सिनेमाची घोषणा

प्रसाद खांडेकर आणि सिनेमातल्या इतर सर्व कलाकारांनी एकदा येऊन तर बघा सिनेमाचं टायटल पोस्टर शेअर केलंय. हे पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये, "लेखक दिग्दर्शक म्हणून माझा पहिला सिनेमा. "एकदा येऊन तर बघा". रिटर्न जाणार नाही"

पुढे सांगण्यात आलंय की, "GRAND OPENING !! अस्सल मराठमोळ्या कॉमेडीचा तडका मारलेली, लहान-मोठे सगळयांना पोट भरून हसवणारी, मनोरंजनाची हमखास गॅरंटी असलेली भरपेट मेजवानी; 'एकदा येऊन तर बघा' रिटर्न जाणार नाही !"

दिग्गज कलाकारांची फौज

एकदा येऊन तर बघा सिनेमात दिग्गज कलाकारांची फौज आहे. सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, ओंकार भोजने, भाऊ कदम, वनिता खरात, रोहित माने असे कलाकार आहेत.

या सिनेमाचं लेखन - दिग्दर्शन प्रसादने केलं असुन स्वतः प्रसाद खांडेकर सुद्धा सिनेमात भुमिका साकारणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : वंचितच्या उमेदवाराने भाजपच्या उमेदवाराला लोळवलं, अकोल्यात मंत्र्यांच्या मावसभावाचा पराभव

Pune Municipal Election Result: राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये गेलेल्या प्रशांत जगताप यांचा भाजपला धक्का, मित्राचा पराभव करत मारली बाजी

Nashik Municipal Election Results 2026 : नाशिक महानगरपालिका निवडणूक मतमोजणीचे पहिले कल समोर; भाजप अन् शिवसेनेची 'इतक्या' जागांवर आघाडी

PMC Election Results : पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग २५ मतमोजणी केंद्रावर प्रचंड गोंधळ; EVM क्रमांक न जुळल्याने रूपाली ठोंबरे आक्रमक

मुंबईत पहिला विजय काँग्रेसचा, भाजपचे नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर विजयी; आतापर्यंत कुणी मारली बाजी?

SCROLL FOR NEXT