CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Esakal
मनोरंजन

Eknath Shinde : 'एकनाथ शिंदे राजीनामा देणार का?' कॉग्रेस नेत्याच्या ट्वीटवर चित्रपट निर्मात्याचं सणसणीत उत्तर!

सकाळ डिजिटल टीम

Eknath Shinde CM Maharashtra political Crisis Sanjay Jha tweet : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर काल झालेल्या सुनावणीमध्ये भलेही शिंदे सरकारला कोणताही धोका नसला तरी कोर्टानं त्यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. यात त्यावेळी व्हीप बजावणारे आणि राज्यपाल कोश्यारी यांच्याप्रती न्यायालयानं दिलेली निरीक्षणं गंभीर आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे सोशल मीडियावर देखील गंभीर पडसाद उमटल्याचे दिसून आले. कोर्टानं शिंदे सरकारला दिलासा दिला. मात्र त्याचवेळी त्यांच्यावर नाराजीही व्यक्त केली आहे. आमदारांच्या पात्रतेचा मुद्दा अजुन प्रलंबित असून त्यावर कोर्ट निकाल देणार नसून त्या निर्णयाचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. असे कोर्टानं म्हटले आहे. यासगळ्यात ट्विटवरुन शिंदे यांच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली होती.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

एका कॉग्रेस नेत्यानं शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर प्रसिद्ध चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी त्या नेत्यावर चांगलीच आगपाखड केली आहे. कॉग्रेस नेता संजय झा यांनी ट्विटवर लिहिलं होतं की, आता तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नैतिकतेचा विचार करुन राजीनामा देतील का, शिंदेजी तुम्हाला भारत बघतो आहे, अशी प्रतिक्रिया झा यांनी दिली होती. यावर संतापलेल्या पंडित यांनी, जा बाळा जा, तुला आता झोपेची गरज आहे. तुला झोप येत आहे. या शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे.

अशोक पंडित यांनी त्या व्टिटवपर दिलेल्या उत्तरानं सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात सूर आळवण्यात येत आहे. एका युझर्सनं लिहिलं आहे की, तुम्हाला सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिला आहे तो सहन झालेला नाही. त्यात जे काही सांगितले गेले आहे ते देखील समजलेले दिसत नाही.

राज वर्मानं लिहिलं आहे की, मोठी माणसं कॉग्रेसमधून बाहेर पडूनही अजून ती तग धरुन आहे. मात्र तुमचे काय होईल याचा विचार तुम्ही केला आहे का, द नॅशनलिस्ट नावाच्या ट्विटर हँडलवरुन असे लिहिले आहे की, मला कुणीतरी सांगितलं की, तुम्ही फिल्ममेकर आहात, आणि एक क्रिएटिव्ह व्यक्ती आहात, पण तुमची भाषा अशी कशी?

काय म्हणाले होते सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड?

सरन्यायाधीश यांनी आपल्या आदेशामध्ये म्हटले होते की, राज्यपालांनी जी भूमिका घेतली होती ती त्यांच्या पदाला आणि कायद्याला धरुन नव्हती. त्यांनी जो निर्णय घेतला त्यांना तो घेता येत नाही. ज्यांनी पक्षातून बंड केले आणि पुन्हा आपण त्याच पक्षाचे आहोत असे सांगितले हे देखील चुकीचे होते. ज्यांनी त्यावेळी व्हिपचा अधिकार बजावला तो बेकायदेशीर होता. सरकारमध्ये मतभेद होते. राज्यपालांकडे जे पत्र होते त्यामध्ये असे म्हटले होते की, उद्धव ठाकरे यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नव्हते. तेव्हा जी फ्लोअर टेस्ट झाली त्यामध्ये या मतभेदाचा उपयोग करणे योग्य नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT