ekta kapoor, pearl v puri file image
मनोरंजन

'बलात्काराचा आरोप खोटा',इंडस्ट्रीने घेतली पर्लची बाजू

अल्पवयीन मुलीच्या बलात्कारप्रकरणी पर्लसह इतर पाच जणांना अटक

प्रियांका कुलकर्णी

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता पर्ल व्ही पुरीला मुंबई पोलिसांनी अटक केली. अल्पवयीन मुलीच्या बलात्कारप्रकरणी पर्लसह इतर पाच जणांना वसईतून अटक करण्यात आली. 'ही घटना जुनी आहे पण १७ वर्षीय मुलीने तिच्या आईसह पोलीस स्थानकांत येऊन तक्रार नोंदवली असून याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला आहे', अशी माहिती मिरा भाईंदर वसई विरार झोन २चे उपायुक्त संजय पाटील यांनी दिली. वसई कोर्टाने पर्लला पोलीस कोठडी सुनावल्याचंही त्यांनी सांगितलं. पर्लच्या अटकेनंतर टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्याची बाजू घेत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. 'नागिन' या मालिकेची निर्माती एकता कपूरनेही पर्लसाठी भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. (ekta kapoor and tv industry celebs supports pearl v puri amid rape allegations)

एकताने पर्लसोबतचा फोटो पोस्ट करत लिहिलं, 'दोघांच्या भांडणात तिसऱ्याला का भरडलं जातं? पीडित मुलीच्या आईसोबत माझे अनेक वेळा बोलणे झाले आहे. त्यांचे मत आहे की, पर्लचे नाव कारण नसताना या प्रकरणात घेतले जात आहे. पर्लचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. पण त्या मुलीचे वडील या सर्व गोष्टींमध्ये पर्लचे नाव घेत आहेत. मालिकेच्या सेटवर काम करणारी महिला आपल्या मुलीची काळजी घेऊ शकत नाही, हे त्यांना सिद्ध करायचं आहे. ही गोष्टी अत्यंत चुकीची आहे. मी टू या मोहिमेचा चुकीचा वापर करणे, स्वत:चा राग काढण्यासाठी लहान मुलांना मानसिक त्रास देणे आणि निर्दोष व्यक्तीला दोषी ठरवणे या सर्व गोष्टी घडत आहेत. मला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. कोण बरोबर, कोण चूक हे न्यायालय ठरवेल. पीडीत मुलीच्या आईने जे मला काल रात्री सांगितले त्यावरुन मी माझं मत मांडत आहे.'

काय सांगितले पिडीत मुलीच्या आईने?

पीडित मुलीच्या आईने एकताला फोन करून सांगितले, 'पर्ल निर्दोष आहे. ही खूप वाईट गोष्ट आहे की लोक त्याला दोषी ठरवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचं अवलंब करत आहेत. त्यांना हे सिद्ध करायचे आहे की आई तिच्या मुलांना सांभाळण्यास असमर्थ आहे.'

एकता कपूरशिवाय अनिता हसनंदानी, निया शर्मा, क्रिस्टल डिसूझा या टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांनीही पर्लला पाठिंबा दिला आहे. 'पर्ल निर्दोष असताना त्याला या प्रकरणात जाणूनबुजून गोवण्यात येतंय', असं मत त्यांनी मांडलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT