Ekta Kapoor & Diljit Dosanjh new punjabi movie  
मनोरंजन

एकताच्या पंजाबी चित्रपटात दलजीत दोसांझ 

वृत्तसंस्था

बॉलीवूडचा ऍक्‍शन हिरो अक्षयकुमार, पिग्गी चॉप्स अर्थात प्रियंका चोप्रा यांनी पंजाबी चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर आता दिग्दर्शिका व निर्माती एकता कपूर "सुपर सिंह' नावाच्या पंजाबी चित्रपटाची निर्मिती करतेय. या चित्रपटात "उडता पंजाब' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेला दलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कारविजेते अनुराग सिंग करणार आहेत. अनुराग सिंग आणि दलजीत दोसांझ यांनी यापूर्वी "पंजाब 1984' आणि "जाट ऍण्ड ज्युलिएट' सीरिजमध्ये काम केलेलं आहे. अभिनेता दलजीत म्हणाला, माझं स्वप्न आहे, की पंजाबच्या प्रेक्षकांना त्यांचा सुपरहिरो देऊ शकेन आणि आता माझं हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

सर्वात खास बाब म्हणजे माझे आवडते दिग्दर्शक अनुराग सिंग "सुपर सिंह'चं दिग्दर्शन करणार आहेत. त्याचबरोबर दलजीत लवकरच अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत "फिल्लोरी' चित्रपटात दिसणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT