Ekta Kapoor would have become chunky panday wife year's ago Instagram
मनोरंजन

'तर आज मी देखील असते बॉलीवूड वाईफ..', चंकी पांडेचं नाव घेत एकताची हैराण करणारी पोस्ट

बॉलीवूडची प्रसिद्ध निर्माती म्हणून नावारुपाला आलेली एकता कपूर चंकी पांडेची खास मैत्रिण म्हणूनही इंडस्ट्रीत ओळखली जाते.

प्रणाली मोरे

Ekta Kapoor: बॉलीवूड अभिनेता चंकी पांडे २६ सप्टेंबरला ६० वर्षांचा झाला. १९८७ मध्ये 'आग ही आग' या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात करत चंकीनं हिंदी इंडस्ट्रीत हळूहळू आपंल नाव कमावलं. त्यानं आपल्या साठाव्या जन्मदिनी बॉलीवूड स्टार्ससोबत सेलिब्रेशन करत,जंगी पार्टी झाडली. सोशल मीडियावर चंकीच्या चाहत्यांपासून अनेक सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा खास अंदाजात दिल्या.

यामध्येच एकता कपूरही होती. जी चंकीची खास मैत्रिण तर आहेच पण इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माता देखील आहे. एकता कपूरनेही चंकी पांडेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पण तिच्या शुभेच्छांनी लोकांना मात्र शॉक बसला आहे. का ते चला जाणून घेऊया..(Ekta Kapoor would have become chunky panday wife year's ago)

चंकीच्या वाढदिवशी एकता कपूरनं आपल्या इन्स्टाग्रामवर चंकीला एका खास इन्स्टा स्टोरीतून शुभेच्छा दिल्या आहेत. एकतानं चंकीसोबतचा एक जुना फोटो शेअर करत पोस्ट मध्ये लिहिलं आहे,''खूप वर्ष आधी चंकी दिसला की माझ्या मनात धकधक सुरू व्हायचं,मी स्वतःशीच लाजायचे,जर तेव्हा त्यानं माझ्या त्या भावना समजून एक स्माइल मला दिलं असतं तर आज मी पण बॉलीवूड वाईफपैकी एक असते. वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा''.

Ekta Kapoor would have become chunky panday wife year's ago

फराह अली खानने देखील चंकी पांडेच्या ६० व्या वाढदिवशी आयोजित केलेल्या पार्टीतले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्या फोटोत चंकीचे इंडस्ट्रीतले सगळे खास बॉलीवूडकर आणि प्रसिद्ध स्टार्स नजरेस पडतायत. या पार्टीत जवळपास बॉलीवूडचे सगळे अभिनेते आणि अभिनेत्री उपस्थित राहिलेले दिसत आहेत.

या पार्टीत चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे(Ananya panday) देखील आपल्या मित्रपरिवारासोबत उपस्थित होती. वडीलांच्या बर्थ डे पार्टीत अर्धाअधिक अनन्याचाच मित्र परिवार उपस्थित होता हे फोटोंवरनं समोर आलं आहे. यामध्ये सुहाना खान, शनाया कपूर आणि इतरही बरेच होते. पार्टीचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT