elvish yadav bigg boss ott 2 winner abhishek malhan manisha rani pooja bhatt
elvish yadav bigg boss ott 2 winner abhishek malhan manisha rani pooja bhatt  SAKAL
मनोरंजन

BB OTT 2 Elvish Yadav: तू ट्रॉफी आणि मन दोन्ही जिंकलंस भावा! एल्विशने विजयी झाल्यावर केलेल्या 'या' कृतीची सर्वांकडून वाहवा

Devendra Jadhav

BB OTT 2 Elvish Yadav Winner: बिग बॉस OTT 2 ची फायनल सोमवारी १४ ऑगस्टला पार पडली. सलमान खान या फायनलचं होस्टिंग करत होता. फायनलमध्ये शेवटच्या क्षणी फुकरा इन्सान म्हणजेच अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव टॉप 2 मध्ये होते.

अखेर या दोघांपैकी एल्विश यादवने फायनलमध्ये बाजी मारली. एल्विश विजयी झाल्यावर त्याच्या फॅन्सला खुप आनंद झाला. एल्विशने जिंकल्यावर एक अशी कृती केली त्यामुळे त्याने सर्वांचं मन जिंकलं.

(elvish yadav bigg boss ott 2 winner abhishek malhan manisha rani pooja bhatt)

एल्विशने जिंकल्यावर केलेल्या या कृतीने सर्व खुश

सलमान खानने एल्विशचं विजेता म्हणुन नाव घोषित केलं. एल्विशने बिग बॉस OTT 2 च्या ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरलं. ट्रॉफी मिळवल्यावर एल्विश जसं आधी म्हणाला होता तसं त्याने ती ट्रॉफी अभिषेकच्या हातात ठेवली.

इतकंच नव्हे मनीषा राणीला सुद्धा एल्विशने बोलावलं. या तिघांनी ट्रॉफी आणि सलमान खान सोबत फोटो काढला. एकुणच जिंकल्यावर सुद्धा एल्विशने जो मोठेपणा दाखवला त्याचं सगळीकडे कौतुक होतंय.

शेवटच्या १५ मिनिटात डाव फिरला

बिग बॉस ओटीटी 2 अभिषेक आणि एल्विश टॉप 2 उरले होते. मनीषा राणी बिग बॉस ओटीटी 2 मधून बाहेर गेली होती. शेवटी सलमान खानने सर्वांना सांगितलं की, १५ मिनिटात एल्विश आणि अभिषेकला वोट करण्याची जनतेला संधी आहे.

१५ मिनिटात एल्विश आणि अभिषेकसाठी वोटींग लाईन्स ओपन झाल्या. आणि १५ मिनिटात वोट्स मध्ये एल्विशने बाजी मारली आणि बिग बॉस ओटीटी 2 वर स्वतःचं नाव कोरलं.

एल्विशला मिळाले २५ लाख रुपये

बिग बॉस OTT सीझन 2 चा विजेता ठरलेल्या एल्विशला 25 लाख रुपये आणि बीबी ओटीटीची चमकणारी ट्रॉफीही मिळाली.

बिग बॉसच्या एतिहासात पहिल्यांदाच वाईल्ड कार्ड एंट्रीने आलेल्या स्पर्धकाने ट्रॉफीवर नाव कोरलं. 17 जूनपासून सुरू झालेल्या 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये 13 स्पर्धक दिसल होते त्यानंतर 4 आठवड्यात घरात वाइल्डकार्ड एंट्री झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Porsche Crash Case: अपघातानंतर ब्लड सॅम्पल बदलण्याचा सल्ला कोणी दिला? पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईचा खुलासा

Kolhapur Crime News: मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कारागृहात हत्या, कैद्यांच्या दोन गटात मारहाणीवेळी घडली घटना

Arvind Kejriwal: 'ब्रश सोबत घ्यायला विसरू नका..'; केजरीवालांच्या तुरुंगात जाण्यावर 'बाबू भैय्या'ने केला हल्लाबोल

Cooking Tips: कारल्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स, सर्वजण खातील आवडीने

Venkatesh Iyer: शुभमंगल सावधान! IPL संपताच KKR चा स्टार ऑलराऊंडर अडकला चढला बोहल्यावर, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT