Elvish Yadav bigg boss ott police updates esakal
मनोरंजन

Elvish Yadav News : सापांच्या तस्करीवर एल्विशचा मोठा खुलासा, 'मी नव्हे तर....', कुणाचं घेतलं नाव?

एल्विश यादव हा आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

युगंधर ताजणे

Elvish Yadav bigg boss ott police updates :

एल्विश यादव हा आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सापांची तस्करी करणे याशिवाय रेव्ह पार्टीचा आरोप एल्विशवर करण्यात आला आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केलाआहे. काही दिवसांपूर्वी एल्विशनं सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल केला होता यामुळे देखील तो बातमीचा विषय होता.

आता एल्विशचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्यांनी आपण नव्हे तर त्या व्यक्तीनं सापांची तस्करी केल्याचा आरोप केला होता. त्यामध्ये एक हरियाणवी गायक दिसत असून एल्विशच्या हातात एक नव्हे तर दोन साप दिसत आहेत. यावरुन जेव्हा एल्विशची चौकशी करण्यात आली तेव्हा त्यानं हरियाणाच्या गायकाचे नाव घेतले होते.

बिग बॉस ओटीटी २ चा विजेता म्हणून एल्विशकडे पाहिले गेले आहे. तो त्याच्या वेगवेगळ्या उद्योगांमुळे चर्चेत राहिला आहे. एल्विश हा लोकप्रिय युट्युबर देखील आहे. त्यानं यापूर्वी व्हिडिओतून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी नोएडा मध्ये जो प्रकार घडला त्यामुळे एल्विश चर्चेत आला होता. त्यातून त्याच्यावर सापांची तस्करी केल्याचा आरोप केला गेला होता. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु असून त्यातून वेगवेगळ्या गोष्टीही समोर आल्या आहेत.

पोलिसांनी एल्विशला तुझ्याकडे हे साप कुठून आले असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यानं हे साप हरियाणवी गायक फाजिलपुरियाचे असल्याचे सांगितले होते. फाजिलपुरिया या सापांचे नियोजन पाहत होता. त्याला किती सापांची गरज आहे असे सांगितल्यास तो उपलब्ध करुन देत असे. असेही एल्विशनं सांगितले होते.

फाजिलपुरिया हा हरियाणाचा असून सापांच्या तस्करी प्रकरणात एल्विशची नोएडा पोलिसांनी तीन तास चौकशी केली होती. त्या दरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. पोलिसांनी एल्विशला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावून घेतले आहे. त्यासंबंधीची नोटीसही त्याला धाडण्यात आली आहे.

फाजिलपुरिया कोण आहे....

एल्विशनं ज्याचं नाव घेतलं तो फाजिलपुरिया हा एक हरियाणवी गायक आहे. तो सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय असणारा गायक आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. त्याच्या गाण्यांना मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे. तो हरियाणवी भाषेत गाणी गाणारा गायक आहे. फाजिलपुरियाचे खरे नाव राहुल यादव असे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Case : अयानने रिल्ससाठी वापरलेल्या दोन पिस्टल नेमक्या कुणाच्या? समोर आली धक्कादायक माहिती...

Pune Fraud News : विवाहविषयक संकेतस्थळावर तोतया शास्त्रज्ञाकडून महिलेची फसवणूक

Pune Rain News : उकाड्याने हैराण पुणेकरांना दिलासा; शहरात मुसळधार पावसाची हजेरी, अनेक भागांत गारपीट

LSG vs RR Live: रिषभ पंत धडपडला... दोन्ही फलंदाज एकाच दिशेला.. चूक अन् राजस्थानला डोकं वर काढण्याची मिळाली संधी Video

Amravati Crime : जन्मदात्या आईचे मुलीसोबत धक्कादायक कृत्य, कारण वाचून तुम्हालाही येईल संताप

SCROLL FOR NEXT