Elvish Yadav esakal
मनोरंजन

Elvish Yadav: "पार्टीमध्ये साप आणि सापाच्या विषाचा सप्लाय केला'; अखेर एल्विश यादवनं पोलिसांसमोर कबुल केलं

Elvish Yadav: पोलीस सध्या एल्विशची चौकशी करत आहेत. चौकशीदरम्यान एल्विश यादवने पोलिसांसमोर कबूल केले आहे की, त्याने रेव्ह पार्ट्यांसाठी साप आणि सापाचे विषाचा सप्लाय केला होता.

priyanka kulkarni

Elvish Yadav: सोशल मीडियावरील प्रसिद्ध यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) याला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. सापाच्या विषाची खरेदी आणि विक्री केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. पोलीस सध्या एल्विशची चौकशी करत आहेत. चौकशीदरम्यान एल्विश यादवने पोलिसांसमोर कबूल केले आहे की, त्याने रेव्ह पार्ट्यांसाठी साप आणि सापाचे विषाचा सप्लाय केला होता.

नोव्हेंबर महिन्यात अटक करण्यात आलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणातील आरोपींशी आपला संपर्क आणि ओळख असल्याचं देखील एल्विशने पोलिसांना सांगितलं आहे.

एल्विश यादवला काल (17 मार्च) पोलिसांनी अटक केली. त्याला वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पीपल फॉर ॲनिमल्स (पीएफए) या संस्थेने रेव्ह पार्टीमधील सापाच्या विषाच्या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता.या संस्थेच्या एका अधिकाऱ्याने एल्विशविरोधात तक्रार दाखल केली होती.

नोएडाच्या सेक्टर 49 पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमधील सहा जणांच्या नावामध्ये एल्विश यादवच्या नावाचा समावेश आहे. यामधील इतर पाच आरोपींना नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली.  राहुल, टीटूनाथ, जय करण, नारायण आणि रविनाथ अशी अशी या आरोपींची नावं आहेत.

एल्विश यादव हा नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी एल्विश हा यूट्यूबर मॅक्सटर्न (Maxtern) उर्फ ​​सागर ठाकूरला मारहाण केल्या प्रकरणी चर्चेत होता.

एल्विशचा चाहता वर्ग मोठा आहे. बिग बॉस ओटीटी 2 या कार्यक्रमामुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाचा एल्विश हा विजेता ठरला. एल्विशचे राव साहब रोलिन हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Chavan Audio Clip : “थांबा जरा, शांत रहा, शिव्या खा”; अशोक चव्हाणांच्या कथित ऑडिओ क्लिपने खळबळ

पुण्यातील पेठांमध्ये राहणं शिक्षा, नागरिक पळून जातायत : विद्यानंद बापट

अमेरिकेत अश्विनी भावेंच्या घरी पोहोचला बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता, जंगी स्वागत, एकत्र जेवण अन्...

Navi Mumbai: जनतेच्या पैशांवर 'अमेरिका वारी', नवी मुंबईच्या महापौरांचा दौरा वादाच्या भोवऱ्यात

Maharashtra Dams : सर्वाधिक धरणे, तरीही पाणी समस्या का? केंद्रीय जलशक्तीमंत्र्यांचा सवाल

SCROLL FOR NEXT