Elvish Yadav FIR Nodia Police Bigg Boss Ott 2 winner Reaction  esakal
मनोरंजन

Elvish Yadav Reaction : 'ओपन चँलेंज करतो जर मी...' एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया समोर, सापांच्या विषाच्या तस्करीचा आरोप

युट्यबर म्हणून नेहमीच चर्चेत असणाऱ्या एल्विशवर विषारी सापांच्या विषाची तस्करी तसेच ते त्यांचा वापर रेव्ह पार्टीमध्ये केल्याचा आरोप आहे.

युगंधर ताजणे

Elvish Yadav FIR Nodia Police Now Bigg Boss Ott 2 winner Reaction : पोलिसांनी एल्विश सारख्या लोकांना तात्काळ अटक करावी. साप अंगावर घेऊन नाचणाऱ्या लोकांना पोलिसांनी शिक्षा करावी. एल्विश सापांचे विष काढून विकतो.त्यामुळे अनेकांच्या किडन्या निकामी होत असून अशा व्यक्तिंना अटक केली जावी. अशी प्रतिक्रिया पीपल फॉर अॅनिमल संस्थेच्या मनेका गांधी यांनी दिली आहे.

बिग बॉस ओटीटी २ चा विजेता आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युंसर्स म्हणून ज्याची तुफान लोकप्रियता आहे त्या एल्विश यादवच्या विरोधआत आता उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मनेका गांधी यांच्या पीपल फॉर अॅनिमल या संस्थेनं एल्विशवर गंभीर आरोप केले आहेत.

मोबाईलवरील 'व्हिडिओ अ‍ॅडिक्शन' मुळे ५ वर्षाच्या मुलामध्ये 'ऑटीझम' ची लक्षणे

युट्यबर म्हणून नेहमीच चर्चेत असणाऱ्या एल्विशवर विषारी सापांच्या विषाची तस्करी तसेच ते त्यांचा वापर रेव्ह पार्टीमध्ये केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आता पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सदर घटनेचा उत्तर प्रदेश पोलिसांनी तपास सुरु केला आहे. त्यावर विविध राजकीय, सामाजिक संस्थाकडून प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

या प्रकरणात आता एल्विशची प्रतिक्रियाही व्हायरल झाली आहे. त्यात त्यानं आपण पूर्णपणे निर्दोष असल्याचे म्हटले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्यानं म्हटलं आहे की, मी आज सकाळी पाहिले की, माझ्यावर कशाप्रकारचे आरोप होत आहेत, कोण काय म्हणाले आहे ते. एल्विशनं नशिल्या पदार्थांची विक्री केली आहे. माझ्यावरील सगळे आरोप खोटे आहेत. त्यात एक टक्काही सत्यता नाही. जर माझी चूक असेल तर मी सगळी जबाबदारी घ्यायला तयार आहे. आणि मी मीडियाला विनंती करतो की, त्यांना जोपर्यत ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यत माझी बदनामी करु नये.

पोलिसांनी एल्विश सारख्या लोकांना तात्काळ अटक करावी. साप अंगावर घेऊन नाचणाऱ्या लोकांना पोलिसांनी शिक्षा करावी. एल्विश सापांचे विष काढून विकतो.त्यामुळे अनेकांच्या किडन्या निकामी होत असून अशा व्यक्तिंना अटक केली जावी. अशी प्रतिक्रिया पीपल फॉर अॅनिमल संस्थेच्या मनेका गांधी यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : संजू सॅमसन गरजला! ख्रिस गेलचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निर्णायक वळण

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनची मॅच विनिंग खेळी! ७ चौकार, ६ षटकारासह ८७ धावा; चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत कायम, दिल्लीचं काय?

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक संतप्त; संशयिताला अटक, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

जुना बोरामणी नाका ‘ब्लॅक स्पॉट’! रुग्णाचे रक्ताचे नमुने घ्यायला जाताना रक्तपेढीचा कर्मचारी ठार; 1 वर्षाच्या मुलीचा 3 दिवसांपूर्वीच झाला होता वाढदिवस

SCROLL FOR NEXT