Elvish Yadav esakal
मनोरंजन

Elvish Yadav: दुबईत आलिशान घर, लग्झरी कारचे कलेक्शन; एल्विश यादव आहे कोट्यवधींचा मालक, एका महिन्यात किती कमावतो?

एल्विश हा कोट्यवधींचा मालक आहे.जाणून घेऊयात एल्विशच्या संपत्तीबद्दल (Elvish Yadav Networth)...

priyanka kulkarni

Elvish Yadav: बिग बॉस OTT 2 चा (Bigg Boss OTT) विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादव (Elvish Yadav) याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवठा केल्या प्रकरणी पोलीस एल्विशची सतत चौकशी करत आहेत. एल्विश यादववर पार्टीमध्ये सापाचे विष वापरल्याचा आरोप आहे. अशताच आता एल्विश यादव हा हॅशटॅग देखील ट्विटरवर (X) ट्रेंड होत आहे. एल्विश हा कोट्यवधींचा मालक आहे.जाणून घेऊयात एल्विशच्या संपत्तीबद्दल (Elvish Yadav Networth)...

एल्विश यादव हा हरियाणातील गुरुग्राम येथील रहिवासी आहे. 2016 मध्ये एल्विशनं YouTube वर व्हिडीओ शेअर करण्यास सुरुवात केली आहे. युट्यूबवरील एल्विशच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळू लागली. त्यानंतर एल्विश हा सोशल मीडिया स्टार झाला. तो YouTube च्या माध्यमातून दर महिन्याला लाखोंची कमाई करतो.

दुबईत आलिशान घर

एल्विशने वजिराबाद, गुडगाव येथे चार मजली आलिशान घर घेतले आहे. या घराची किंमत सुमारे 12 ते 14 कोटी रुपये आहे, असं म्हटलं जात आहे. हे घर 16 BHK आहे. याशिवाय दुबईमध्ये 8 कोटी रुपयांचे आलिशान घर आहे.

बिग बॉस OTT कार्यक्रमासाठी किती घेतलं मानधन?

एल्विश यादव हा युट्यूबसोबतच इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर अकाऊंट्सवरुन कमाई करतो. त्यानं बिग बॉस OTT या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 15-20 लाख रुपये मानधन म्हणून घेतले. हा शो जिंकल्यानंतर त्याला 25 लाख रुपये मिळाले.

दर महिना किती कमावतो?

एल्विश हा सुमारे 10-15 लाख रुपये दर महिन्याला कमावतो. त्याची एकूण संपत्ती अंदाजे 40 कोटी रुपये आहे. एल्विश यादव एका व्हिडीओसाठी जवळपास 4 ते 6 लाख रुपये मानधन घेतो, असं म्हटलं जात आहे.

लग्झरी गाड्यांचे कलेक्शन

एल्विशकडे लग्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे. त्याच्याकडे 1.41 कोटी रुपयांची पोर्श 718 बॉक्सस्टर कार आहे. याशिवाय त्याच्याकडे ह्युंदाई वेर्ना आणि टोयोटा फॉर्च्युनर सारख्या इतर लग्झरी गाड्या देखील आहेत. ही सर्व संपत्ती त्याने यूट्यूबवरून कमावली आहे.

यूट्यूबर आणि बिग बॉस OTT 2 चे विजेते एल्विश यादव यांना वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत खटल्याच्या संदर्भात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भागवत कांबळे रंगेहाथ अडकले

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT