Elvish Yadav esakal
मनोरंजन

Elvish Yadav: ना लग्झरी गाड्या ना कोट्यवधींची प्रॉपर्टी; एल्विश यादवच्या संपत्तीबद्दल काय म्हणाले आई-वडील?

Elvish Yadav: एल्विशच्या लाइफस्टाइलबाबत सोशल मीडियावर चर्चा होत असते.अशताच आता एल्विशच्या संपत्तीबद्दल त्याच्या आई-वडिलांनी खुलासा केला आहे.

priyanka kulkarni

Elvish Yadav: गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस OTT 2 चा (Bigg Boss OTT) विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादव (Elvish Yadav) हा चर्चेत आहे. एल्विश सध्या तुरुंगात आहे. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवल्याचा एल्विशवर आरोप आहे. सोशल मीडियावर एल्विशबाबत अनेक बातम्या पसरत आहे. एल्विशच्या लाइफस्टाइलबाबत देखील सोशल मीडियावर चर्चा होत असते.अशताच आता एल्विशच्या संपत्तीबद्दल त्याच्या आई-वडिलांनी खुलासा केला आहे.

एल्विश यादवचे गुडगावमध्ये फ्लॅट्स आहेत, तसेच त्याच्याकडे लग्झरी गाड्यांचे कलेक्शन देखील आहे, असं सोशल मीडियावर बोललं जातं. अशताच आज तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये एल्विशच्या वडिलांनी त्यांच्या संपत्तीबद्दल आणि एल्विशच्या लाइफस्टाइलबद्दल सांगितलं आहे.

काय म्हणाले एल्विशचे वडील?

एल्विशच्या वडिलांनी सांगितलं, "माझ्या मुलाकडे कोणत्याही आलिशान गाड्या नाहीयेत. आमच्याकडे फक्त दोन गाड्या आहेत. फॉर्च्युनर आणि वॅग्नार या दोनच गाड्या आमच्याकडे आहेत. एल्विशकडे कोणतीही प्रॉपर्टी नाहीये. आम्हाला फक्त एका जमिनीच्या बदल्यात प्लॉट मिळाला आहे. एल्विश व्हिडीओसाठी मित्रांच्या गाड्या भाड्याने घेतो. बिग बॉस जिंकल्यानंतर एल्विशला पैसे मिळाले, तसेच एल्विशने कपड्यांचा व्यवसाय केला, जॅकेट विकले आणि YouTube वरील व्हिडीओंमधून पैसे कमवले."

जेव्हा मुलाखतीमध्ये एल्विशच्या पालकांना त्याच्या YouTube कमाईबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले, "जेव्हा एल्विश तुमच्याकडे मुलाखत द्यायला येईल तेव्हा तुम्ही त्याला YouTube कमाईबद्दल विचारा . आमचा मुलगा पूर्णपणे निर्दोष आहे."

एल्विशचा चाहता वर्ग मोठा आहे. एल्विशला बिग बॉस ओटीटी 2 या कार्यक्रमामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. एल्विशचे राव साहब रोलिन हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Drop : वर्षाचा शेवट गोड! सोने-चांदी दरात घसरण, नवीन वर्षात सोन्या चांदीचे भाव जाणून घ्या

Mumbai Rain: मुंबईत २०२६ ची सुरुवात आश्चर्याने! थंडीच्या काळात पावसाची एंट्री

Latest Marathi News Live Update : कृष्णेकाठी वसलेल्या साताऱ्यात आजपासून सारस्वतांचा मेळा भरणार

2026 मध्ये OTT वर धुमाकूळ घालायला येताय नव्या सीरिज, प्रेम, ड्रामा, थ्रिल आणि अ‍ॅक्शनने भरलेली ही यादी, एकदा नक्की वाचा!

Pune Municipal Election : धोकादायक २१ जागांनी वाढविली चिंता; २०१७ मध्ये एक हजारापेक्षा कमी मतांनी जिंकलेल्या जागांवर लक्ष

SCROLL FOR NEXT