Emergency Teaser Viral  esakal
मनोरंजन

Teaser of Emergency : आजच्याच दिवशी घडली भारतीय लोकशाहीला काळीमा फासणारी गोष्ट!

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना ही तिच्या परखड स्वभावासाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. भारतीय मनोरंजन विश्वामध्ये सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे.

युगंधर ताजणे

Emergency Kangana Ranaut bollywood Actress : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना ही तिच्या परखड स्वभावासाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. भारतीय मनोरंजन विश्वामध्ये सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. आता कंगनानं तिच्या नव्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. मात्र ती ज्या विषयावर चित्रपटाची निर्मिती करते आहे तो विषय खूपच गंभीर आहे.

कंगना ही भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकची निर्मिती करते आहे. त्यात तिनं इंदिरा गांधी यांची भूमिका केली आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा फर्स्ट लूक व्हायरल झाला होता. त्यात कंगनाच्या भूमिकेचे अनेकांनी प्रचंड कौतूक केले होते. अगदी हुबेहूब इंदिरा गांधी अशा शब्दांत कंगनाचे नेटकऱ्यांनी कौतूक करत तिच्या या आगामी प्रोजेक्टला शुभेच्छा दिल्या होत्या.

Also Read- Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

आता कंगनानं ज्या दिवशी भारतीय लोकशाहीवर आणि लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्यात आला. त्यांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणण्यात आली त्या आणीबाणीच्या दिवसाची आठवण आपल्या इमर्जन्सी नावाच्या चित्रपटाच्या टीझरमधून करुन दिली आहे. सोशल मीडियावर त्या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून नेटकऱ्यांनी कंगनाच्या अभिनयाचे कौतूक केले आहे. यावर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना कोणत्या ना कोणत्या निमित्तानं चर्चेत येत असते. कंगना रनौतच्या ‘इमरर्जन्सी’ चित्रपट चर्चेत आला आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला यात पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका कंगना साकारणार आहे. कंगनाचा ‘इमरर्जन्सी’ चित्रपट येत्या 24 नोव्हेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

टीझरची सुरुवात 25 जून 1975 या दिवसापासून होते. जेव्हा निर्देशक रस्त्यावर गोंधळ घालत होते आणि ते आणीबाणी घोषित या मथळ्यासह वर्तमानपत्रातील कटआउट असल्याचे दिसते. अनुपम खेर यांच्या व्हॉईसओव्हरमध्ये ,”विरोधी पक्षाच्या नेत्याला अटक” या मथळ्यासह आम्ही त्यांना तुरुंगाच्या मागे पाहतो.

चित्रपटात दिवंगत राजकीय नेते जयप्रकाश नारायण यांच्याही नावाचा उल्लेख आहे. भूमिका साकारली आहे, ज्यांना जेपी नारायण म्हणूनही ओळखले जाते. हा आमचा मृत्यू नाही तर देशाचा मृत्यू आहे, असे तो म्हणतो.

टीझरमध्ये आंदोलकांना रस्त्यावर गोळ्या घालताना दिसत आहे. (आम्हाला ही हुकूमशाही थांबवायची आहे). तेव्हाच इंदिरा गांधीच्या भूमिकेत कंगना रनौतचा व्हॉईसओव्हर सुरु होतो, तेव्हा त्या म्हणतात मला या देशाचे रक्षण करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तेव्हा चेहरा पडद्यावर दिसतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai Satara Bank Election Victory : सातारा जिल्हा बँकेत घडला इतिहास! स्व. शिवाजीराव देसाईंनंतर 45 वर्षांनी देसाई घराण्याची दमदार एन्ट्री; पालकमंत्र्यांचा उर आला भरुन

IND vs NZ, ODI: रोहित शर्मा न्यूझीलंडमध्ये घडवणार इतिहास? विश्वविक्रमांसह ७ मोठे पराक्रम करण्याची संधी

Mhada House: फक्त २० लाखांत म्हाडा देणार १,४०० घरे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कोकण मंडळाचा पुढाकार

Latest Marathi News Live Update : माझ्याविरोधात षडयंत्र रचलं, वरून आदेश होते; पण त्यांच्यात कानफाडात मारण्याची हिंमत नव्हती, अजित घोरपडेंचा जयंत पाटलांना अप्रत्यक्ष इशारा

Diwali Bonus: राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त ७ हजार रुपयांपर्यंत बोनस; सरकारने जाहीर केल्या अटी

SCROLL FOR NEXT