Emma Watson’s stalker wanted to marry him breaks into fashion show to look for her, gets arrested SAKAL
मनोरंजन

Emma Watson: "मला तुझ्याशी लग्न करायचंय", हॅरी पॉटर फेम अभिनेत्रीच्या फॅनचा धिंगाणा

इमा वॉटसनच्या फॅनने तिला थेट लग्नाची मागणी घातलीय

Devendra Jadhav

Emma Watson News: फॅन कलाकारांवर जीव ओवाळत असतात. हेच फॅन कधीकधी कलाकारांसाठी त्रासदायक ठरु शकतात. असाच एक अनुभव हॅरी पॉटर फेम इमा वॉटसनला आला.

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एका फॅशन शोदरम्यान ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश करून सेलिब्रिटींना वारंवार फॉलो केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.

ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश केल्यानंतर आरोपी चाड मायकल बुस्टो शांत राहिला नाही, उलट तो अभिनेत्री एम्मा वॉटसनशी लग्न करू इच्छित असल्याचे ओरडत होता.

'मला एम्माशी लग्न करायचे आहे' फॅनचा आरडाओरडा

रिपोर्टनुसार, चॅड मायकेल बुस्टो शुक्रवारी रात्री फॅशन शोच्या ड्रेसिंग रूममध्ये घुसला आणि “मला एम्मा वॉटसनशी लग्न करायचे आहे” असे ओरडू लागला. मला एम्मा वॉटसनशी बोलू दे. मला एम्मा वॉटसनसोबत फोटो काढू दे.”

अधिकाऱ्यांनी सांगितले की चाड मायकेल बुस्टोला फॅशन शोमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देखील नव्हती. त्याला बाहेर येण्यास सांगितले असुनही त्याने ते मान्य केले नाही.

चाड मायकेल बुस्टोला तुरुंगवास

चाड मायकेल बुस्टोने असे कृत्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, 43 वर्षीय चाड मायकेलला अभिनेत्री ड्र्यू बॅरीमोरचा पाठलाग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर त्याची सुटका करण्यात आली.

या प्रकरणी तो ऑक्टोबरमध्ये न्यायालयात हजर होणार होता. पण, त्याआधीच, चाड मायकेल बुस्टोच्या या कृतीमुळे त्याला पुन्हा तुरुंगात टाकले गेले.

हॅरी पॉटर चित्रपटातून प्रसिद्ध झालेली एम्मा वॉटसन त्या फॅशन शोमध्ये उपस्थित होती की नाही हे स्पष्ट झालेले नाही. हॅरी पॉटर फ्रँचायझी व्यतिरिक्त, एम्मा वॉटसन ब्युटी अँड द बीस्टसाठी देखील ओळखली जाते.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT