Emotional Priyanka Chopra Tears Up at Nick Jonas' Jonas Brothers Concert, Video Goes Viral SAKAL
मनोरंजन

Priyanka Chopra Video: पती निक जोनासच्या भर कॉन्सर्टमध्ये प्रियंका चोप्रा रडली, व्हिडीओ व्हायरल

निक जोनासचा कॉन्सर्टमधला प्रियंका चोप्राचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला

Devendra Jadhav

Priyanka Chopra Viral Video: प्रियंका चोप्रा आणि निक जोनास हे कपल सोशल मिडीयावर चर्चेत असतं. प्रियंका आणि निक यांची जोडी सोशल मिडीयावर कमालीची पसंत केली जाते. प्रियंकाचं नवऱ्यावर किती प्रेम आहे याचा अनुभव नुकताच आला.

निक जोनासचा कॉन्सर्टमधला एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत प्रियंका चोप्राच्या डोळ्यात नवऱ्याला लाईव्ह परफॉर्म करताना पाहून डोळ्यात पाणी आलं. बघुया सविस्तर काय झालं.

(Emotional Priyanka Chopra Tears Up at Nick Jonas' Jonas Brothers Concert, Video Goes Viral)

प्रियंकाने केलं नीक जोनासचं कौतुच

अलीकडेच.. प्रियंका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिचा पती निकसाठी एक अतिशय गोड नोट लिहिली. या पोस्टमध्ये प्रियांकाने निकला त्याच्या नवीन कॉन्सर्टसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. निक जोनासचा कॉन्सर्ट सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला. या कॉन्सर्टमध्ये प्रियंका सुद्धा उपस्थित होती. यावेळी नवऱ्याला स्टेजवर लाईव्ह परफॉर्म करताना प्रियंकाच्या डोळ्यातील अश्रू पुसताना दिसली. प्रियंकाच्या डोळ्यात आलेलं हे पाणी निश्चितच आनंद होतं

नीकच्या गायनाचं प्रियंकाने केलं कौतुक

प्रियंकाने तिच्या चिठ्ठीत लिहिले की, 'निक तू एक चुंबक आहेस आणि मी खूप भाग्यवान आहे की तू माझ्यासोबत आहेस. एक नवीन आणि सुंदर प्रवास सुरू केल्याबद्दल निकचे अभिनंदन. तुम्ही सर्वजण मोठ्या प्रवासावर आहात. चल जाऊया! जेबी टीम बँड आणि क्रूने अप्रतिम काम केले आहे. लोकांना तुमचा शो खूप आवडतो. आज रात्री दुसऱ्या शोची आतुरतेने वाट पाहत आहे.

प्रियंका चोप्राचं वर्कफ्रंट

प्रियंकाचा हा छोटासा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलंय. प्रियंका सर्वसामान्य व्यक्तींसोबत गर्दीत उभी राहून निकच्या कॉन्सर्टचा आनंद घेत होती.

प्रियंका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती आगामी काळात 'सिटाडेल 2', 'हेड्स ऑफ स्टेट' आणि हिंदी सिनेमा 'जी ले जरा' मध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT