Emotional Shah Rukh Khan told NCB officer, after Aryan Khan’s arrest in drugs case Google
मनोरंजन

आर्यन खानला अटक झाल्यावर NCB ला काय म्हणालेला शाहरुख? भावूक संभाषण आलं समोर

आर्यन खानला ड्रग्ज केस प्रकरणात आता एनसीबीनं क्लीन चीट दिली आहे.

प्रणाली मोरे

आर्यन खानला(Aryan Khan) ड्रग्ज केस(Drugs Case) प्रकरणात अटक झाल्यानंतर शाहरुख खान(Shahrukh Khan) आणि कुटुंबानं आतापर्यंत या सर्व प्रकरणावर बोलणं टाळलं होतं. आर्यनला ऑक्टोबर २०२१ मध्ये एनसीबीच्या(NCB) अधिकाऱ्यांनी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुझ वर टाकलेल्या छाप्या दरम्यान अटक केली होती. या कारणानं काही दिवस त्याला तुरुंगातही रहावं लागलं होतं. २८ ऑक्टोबरला आर्यनला जामिन मिळाला होता. काही दिवसांपूर्वीच २४ वर्षीय आर्यनवर या प्रकरणासंदर्भात लावले गेलेले निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. एनसीबीनं काही दिवस आधी या ड्रग्ज केस प्रकरणात जे चार्जशीट दाखल केलं त्यात आर्यनचं नाव नव्हतं. याचा अर्थ असाच होतो की आर्यनला एनसीबीनं या प्रकरणातून क्लीन चीट दिली आहे.

आर्यन खानने तुरुंगात जितके दिवल घालवले ते त्याच्यासाठी खडतरच होते. या दरम्यान शाहरुखही एकदा त्याला परवानगी काढून भेटायला गेलेला आपण सगळ्यांनीच पाहिला असेल. आर्यनला एनसीबीनं ड्रग पेडलर(विक्रेता) देखील म्हटलं होतं. अर्थात त्याच्याकडे त्यावेळी देखील कोणत्याही प्रकारचं ड्रग्ज मिळालं नव्हतं. शाहरुख आणि त्याच्या कुटुंबानं या प्रकरणावर आतापर्यंत बोलणं टाळलं होतं. आता मात्र यासंदर्भात एनसीबीचे अधिकारी(ऑपरेशन्स) संजय सिंग बोलले आहेत. त्यांनी खुलासा केला आहे की आर्यन खान ड्रग केस प्रकरणात त्यांचे शाहरुखशी बोलणे झाले होते.

संजय सिंग(Sanjay singh) यांनी आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणात तपासासाठी स्पेशल शोधपथक म्हणजेच SIT बनवली होती. आणि या पूर्ण तपासा दरम्यान संजय सिंग यांचा आर्यनसोबतच त्याचे वडील आणि सुपरस्टार अभिनेता शाहरुखशी देखील बोलणं झालं होतं. एका हिंदी वेबसाईट सोबतच्या मुलाखतीत संजय सिंग यांनी सांगितलं आहे की शाहरुखने त्यांना भेटल्यानंतर आर्यन संदर्भात बोलणं केलं होतं. आणि आपल्या मुलाविषयी बोलता बोलता त्याच्या डोळ्यात अश्रू देखील आले होते.

संजय सिंग यांनी खुलासा केला आहे की तपास करताना त्यांना कळालं की आर्यनचे वडील म्हणून शाहरुखला त्यांना भेटायचं आहे. ते दुसऱ्याही आरोपींच्या पालकांना भेटत होते म्हणून शाहरुखला भेटण्यासाठी देखील ते तयार झाले. जेव्हा शाहरुख आणि संजय सिंग भेटले तेव्हा,शाहरुखनं आपला मुलगा आर्यनच्या मानसिक आणि भावनिक अवस्थेविषयी काळजी व्यक्त केली होती. संजय सिंग म्हणाले की,''त्यावेळेस आर्यंन झोपू शकत नव्हता त्यावेळी शाहरुखनं त्याच्या रुममध्ये जाऊन त्याची रात्रभर काळजी घेतली होती''.

संजय सिंग यांच्या म्हणण्यानुसार,शाहरुख खाननं म्हटलं होतं की,त्याच्या मुलाला कोणत्याही पुराव्या शिवाय आरोपी ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही नाहक बदनामी आहे. डोळ्यात अश्रू दाटून आलेला शाहरुख संजय सिंग यांना म्हणाला होता,''आम्हाला खूप मोठ्या क्रिमिनल बॅकग्राऊंडमधून आल्यासारखं दाखवलं जात आहे,माझा मुलगा सराईत गुन्हेगार आहे,जो समाजासाठी घातक आहे असं चित्र निर्माण केलं जात आहे. आणि या सगळ्यामुळे मी रोज कामासाठी देखील बाहेर पडणं कठीण होऊन बसलं आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Latest Marathi Breaking News:विहिरीत पडला बिबट्या, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Ironman Competition: 'पांगरीच्या अजय दडस यांचे आयर्नमॅन स्पर्धेत यश'; गोव्यातील स्पर्धेत ३३ देशांतील सुमारे १३०० खेळाडू सहभागी

Viral Jugaad Video : चाक नसतानाही सुस्साट धावू लागला टेम्पो, जुगाडाचा बादशहा ठरला ड्रायव्हर; व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Pushkar Singh Dhami : सीएम धामींनी संरक्षण मंत्र्यांसमोर ठेवल्या सामरिक महत्त्वाच्या मागण्या; नंदा राजजात यात्रेच्या मार्गावरही केली चर्चा

SCROLL FOR NEXT