Emraan Hashmi buys Rolls-Royce
Emraan Hashmi buys Rolls-Royce Esakal
मनोरंजन

Emraan Hashmi: इम्रान हाश्मीच्या घरी आला नवा पाहुणा! व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

Emraan Hashmi buys Rolls-Royce: इम्रान हाश्मी त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत होता. मात्र आता तो वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. इम्रानच्या घरी नवा पाहुणाआला आहे. त्याने नवीन वर्षी एक नवीन आलिशान कार आपल्या घरी आणली आहे.

इम्रान हाश्मीने नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्वत:ला एक नवी चमकणारी कार भेट दिली आहे. इम्रानने गुरुवारी, भारतातील सर्वात महागडी रोल्स-रॉइस घोस्ट ब्लॅक बॅज कार खरेदी केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कारची किंमत 12.25 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. इम्रानचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो नवीन कारमध्ये बसलेला दिसत आहे. पापाराझींनी इम्रानला मुंबईत नवीन कारसोबत स्पॉट केले.

इम्रानला नव्या आणि महागड्या कारची खुप आवड आहे. त्याच्याकडे Lamborghini Huracan Technica (रु. 3 कोटी), Range Rover Vogue (1.7 कोटी), मर्सिडीज एस-क्लास (1.9 कोटी), ऑडी A8 L (1.5 कोटी) आणि . 55 लाखाची BMW 5-सीरीज आहेत. मिडिया रिपोर्टनुसार त्याची नेटवर्थ 105 करोड आहे.

इम्रान हाश्मी हा शेवटचा 'टायगर 3' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्यांने मुख्य खलनायकाची भूमिका साकारली होती. आता इम्रान 'डॉन 3'मध्ये खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

'डॉन 3' मध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार असून एक्सेल एंटरटेनमेंटचे रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर निर्मित आहेत. हा चित्रपट 2025 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT