मनोरंजन

जॅकलिन फर्नांडिसच्या मागे ईडी; तब्बल पाच तास कसून चौकशी

विनायक होगाडे

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने सध्या अनेकांची चौकशी सुरु केली आहे. यातच आता बॉलिवूडमधून मोठं नाव समोर येत आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची गेल्या पाच तासांपासून ईडी दिल्लीत चौकशी करत आहे. याबाबतचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

भूत पोलिस या तिच्या आगामी चित्रपटात सहकलाकार असणारी अभिनेत्री यामी गौतमला देखील ईडीने या वर्षाच्या सुरुवातीलाच समन्स बजावले होते. फेमा कायद्याअंतर्गत आर्थिक अनियमितेतप्रकरणी ही चौकशी करण्यात आली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामीच्या बँक खात्यात 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम परदेशी संस्थेकडून आली होती. मात्र, ही रक्कम स्विकारताना फेमा कायद्यातील नियमांचे पालन करण्यात आलेलं नव्हतं. म्हणूनच, बँकेने ईडीला या व्यवहाराबद्दल माहिती दिली होती.

सध्या यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिस या दोघीही सैफ अली खान आणि अर्जुन कपूर यांच्यासमवेत 'भूत पोलिस' या आगामी हॉरर चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट १७ सप्टेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT