मनोरंजन

मराठी चित्रपटसृष्टीत नाशिकचा नवा चेहरा

हर्षदा देशपांडे

‘वा..! पहिलवान’ लवकरच चित्रपटगृहांत 
नाशिक - संगीत, नाट्य व अभिनय अशा अनेक ठिकाणी नाशिकचे कलाकार आपला नावलौकिक वाढवत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत आपले नाव उज्ज्वल करण्यासाठी पल्लवी कदम हा नवा चेहरा मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

हिंदी, मराठी चित्रपटांत छोट्या भूमिका साकारणारी पल्लवी लीड रोलमध्ये ‘वा..! पहिलवान’ या चित्रपटाच्या माध्यमातून स्वत:ला सिद्ध करणार आहे. मराठी मालिकांतून ‘माझिया माहेरा’, ‘लक्ष्य’, मराठी चित्रपट ‘फक्त सातवी पास’, ‘जरब’, ‘यूथ’, हिंदी सिनेमा ‘बुलेट राजा’, ‘खाकी’ अशा चित्रपटांतून पल्लवीने छोट्या भूमिका साकारल्या होत्या. ‘बुलेट राजा’तील तिची पत्रकाराची भूमिका लक्षात राहणारी ठरली. जिनिअस ग्रुपचे ‘रिमझिम रिमझिम’ हे नाटकही तिने केले आहे. पण ‘वा..! पहिलवान’च्या माध्यमातून राधा हे मुख्य पात्र तिला साकारण्याची संधी मिळाली आहे. ‘वा..! पहिलवान’ कुस्ती करणाऱ्या ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यावरील तरुणाची ही कथा आहे. या तरुणाचे लग्न राधेसोबत होते आणि त्याच्या कुस्ती व लग्नाच्या नात्यातील रंगलेला खेळ, हे ‘वा..! पहिलवान’ या चित्रपटातील कथेचे मुख्य सूत्र आहे. त्यामुळे राधेची भूमिका ही आव्हानात्मक होती. पुण्याच्या खेड, आंबेगाव येथे चित्रपटाचे शूटिंग झाले असून, ग्रामीण ढंगातील अभिनय करणे आणि तेथील जीवन जाणून घेण्यासाठी पल्लवीने मोठी मेहनत घेतली आहे. बहुरंग बॅनरखाली तयार होत असलेला हा चित्रपट पहिलवानाचे आयुष्य समाजासमोर मांडण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील देहबोलीपासून ते भाषा अशा अनेक गोष्टींवर मी काम केले. पेहराव आणि कथेला साजेसा अभिनय हे खरेच आव्हान होते. याआधी साकारलेल्या भूमिका छोट्या होत्या. त्यामुळे कधी दडपण आले नाही, पण लीड रोलसाठी काम करताना चॅलेंज वाटले. 
-पल्लवी कदम, अभिनेत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

मालमत्ता ४ कोटींची, मग १३ कोटींची रोल्स रॉयस कुठून आली? मैथिली ठाकूरच्या व्हिडीओवरून CAचा सवाल, चौकशीची मागणी

Bihar viral video case: जमुई अल्पवयीन मुलीचं छेडछाड प्रकरण! राष्ट्रीय महिला आयोग आक्रमक, पोलीस महासंचालकांना कठोर निर्देश

Lohara Crime : पतीने धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा केला खून; हल्ल्यानंतर पतीने स्वतःवर वार करून पोलिस ठाण्यात झाला हजर

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT