Esha Deol Bharat Takhtani Divorce  esakal
मनोरंजन

Esha Deol Divorce : 'दुसरी मुलगी झाली अन्...' ईशाच्या 'त्या' पुस्तकातून वेगळीच माहिती समोर!

बॉलीवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची मुलगी अभिनेत्री ईशा देओल आणि भरत तख्तानीचा घटस्फोट झाला आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Esha Deol Bharat Takhtani Divorce : बॉलीवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची मुलगी अभिनेत्री ईशा देओलचा घटस्फोट झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ईशा आणि तिचा पती भरत तख्तानी यांच्यातील वाद समोर आला होता. ते घटस्फोट घेणार याविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. आता त्यांनी घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले आहे.

अकरा वर्षांच्या संसारानंतर त्यांनी परस्पर संमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना दोन मुली असून त्यांची नावं राध्या आणि मिराया अशी आहेत. यापुढील काळात मुलींच्या (Esha Deol Bharat Takhatani Divorce Latest News) संगोपनासाठी वेळ देणे आणि त्याला प्राधान्य देणे ही त्यातील प्रमुख गोष्ट असल्याचे सांगण्यात आले आहे. यात आता सोशल मीडियावर त्यांच्यात नेमक्या कोणत्या कारणामुळे घटस्फोट झाला याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

यापूर्वी सोशल मीडियावर ज्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या त्यात असे म्हटले होते की, भरत आणि ईशा हे गेल्या काही दिवसांत कोणत्या कार्यक्रमांना एकत्र दिसले नाहीत. त्यांची कोणतीही पोस्ट नाही. त्यावरुनच त्यांच्या वेगळं होण्याच्या चर्चेला उधाण आले होते. त्यात आता ईशाच्या २०२० मध्ये आलेल्या एका पुस्तकाचा दाखला दिला जात आहे.

त्यामध्ये ईशानं (Esha Deol Latest News) म्हटले आहे की, माझ्याकडून भरतच्याबाबत अनेक गोष्टींबाबत दुर्लक्ष झाले. जेव्हा आम्हाला दुसरी मुलगी झाली तेव्हापासून आमच्यातील वाद वाढत होते. ईशाच्या अम्मा मिया (Amma Mia Book) नावाच्या पुस्तकात ईशानं वैवाहिक नात्यावर भाष्य केलं आहे. ती म्हणते, दुसरी मुलगी झाली आणि भरत माझ्यापासून दुरावला गेला. आम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नव्हतो.

मला माझ्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमुळे त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. ऑफिसची कामं, वेगवेगळे असाईनमेंटस, त्यात माझ्या नव्या पुस्तकाचे लेखन यामुळे भरतला वेळ देणं शक्य नव्हते. कोणत्याही पतीला असे दुर्लक्षित केल्यावर वाईट वाटणं साहजिकच आहे. कारण मला त्याला वेळ देता येत नव्हता.

राध्या आणि मिराया यांची शाळा, त्यांच्याकडे द्यावे लागणारे लक्ष आणि त्यात माझ्या प्रॉडक्शनच्या मिटिंग्ज यामुळे माझ्या आणि भरतच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. या गोष्टी भरतनं नोटीस केल्या होत्या. मलाही माझे काही चुकते आहे हे निदर्शनास आले होते. असे ईशानं त्या पुस्तकात म्हटले आहे.

मला अजुनही आठवतंय भरतनं माझ्याकडे नव्या टुथब्रशची मागणी केली होती. आणि मी तो त्याला द्यायला विसरले होते. त्याचं शर्ट माझ्याकडून प्रेस करायचं राहून गेलं होतं. मी कित्येकदा त्याला ऑफिसमध्ये डबा पाठवायलाही विसरले. मला माहिती आहे की, भरतच्या अपेक्षा खूप मर्यादित आहेत. पण मी हे सगळं सुधारण्याचा प्रयत्न केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News : कारागिराने जबड्यात लपविले 15 लाखांचे सोने, पण 'या' एका चुकीमुळे उघड झाली चोरी

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

SCROLL FOR NEXT