Esha Deol sakal
मनोरंजन

Esha Deol: 'धूम'मध्ये बिकिनी सीनपूर्वी खुप घाबरली होती इशा देओल तेव्हा आई हेमा मालिनीकडून...

धूम या गाजलेल्या चित्रपटात अभिनेत्री इशा देओलने बिकिनी घालून सीन्स केले होते. त्यावेळी तिच्या या लूकची खूप चर्चा झाली होती.

Aishwarya Musale

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लाडकी मुलगी ईशा देओलने तिच्या करिअरमध्ये फार कमी चित्रपट केले आहेत. तिच्या आईप्रमाणेच ती एक चांगली अभिनेत्री आणि उत्तम डान्सर देखील आहे.

ती 'युवा', 'दस', 'नो एंट्री' आणि 'धूम' सारख्या काही उत्कृष्ट चित्रपटांमध्ये दिसली आहे. दरम्यान, अभिनेत्रीने 'धूम' चित्रपटाच्या टायटल ट्रॅकमधील तिच्या बिकिनी सीनबद्दल काही गोष्टी शेअर केल्या आहेत.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ईशा देओलने खुलासा केला की जेव्हा आदित्य चोप्राने तिला सांगितले की या अॅक्शन चित्रपटात तिला बिकिनी घालावी लागेल. त्यांची ही गोष्ट ऐकून ईशा थोडी आश्चर्यचकित आणि नाराज झाली होती.

या चित्रपटात तिला बिकिनी घालावी लागेल हे तिला आधी माहीत नव्हते. आदित्य चोप्रांसमोर तिने यासाठी लगेच होकार दिला नाही, मात्र त्यासाठी तिने एक दिवसाचा वेळ मागितला. आई (हेमा मालिनी) हिची परवानगी घ्यावी लागेल असे इशाने सांगितले.

ईशा देओलने या मुलाखतीत पुढे सांगितले की, चित्रपटात बिकिनी घालण्यासाठी आईची परवानगी घ्यायला ती खूप घाबरली होती. मात्र, तिने हेमा मालिनी यांच्याशी याबाबत बोलले असता ती म्हणाली, हो, तुला जे पाहिजे ते घाल.

"जेव्हा तू तुझ्या मित्रांसोबत सुट्टीवर किंवा बाहेर फिरायला जाते तेव्हा तू बिकिनी घालत, नाही का? मग चित्रपटात घातली तर काय झालं? फक्त सीन चांगले शूट केले जातील, याची खात्री करून घे." असे सांगत हेमा मालिनी यांनी इशाला पाठिंबा दिला.

Esha Deol

विशेष म्हणजे, 'धूम' 2004 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी केली. या चित्रपटात ईशा देओल मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती, तर अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

याशिवाय या चित्रपटात उदय चोप्राने सहाय्यक भूमिका केली असून ईशा देओलने शीनाची भूमिका साकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan: कल्याण कोर्टाबाहेर वकील आणि मद्यधुंद पोलिसात हाणामारी, गैरवर्तन केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Shaktipeeth Highway Controversy : शक्तिपीठ महामार्ग झाल्यास पश्‍चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका, राजू शेट्टींनी मांडल गणित; '१७ किमीचा डोंगराएवढा भराव'

मराठमोळ्या अभिनेत्याने घेतलं तिसरं घर, गणेशपूजाही केली, चिमुकल्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : पेट्रोल-डिझेलचा साठा एक महिन्याचा आहे- छगन भुजबळ

IPL 2026 : विराट कोहलीचा 'पार्टनर' परतणार, RCB प्ले ऑफमध्ये राडा घालणार… गतविजेत्यांना मिळालं बळ

SCROLL FOR NEXT