Esha Deol Instagram
मनोरंजन

Esha Deol Video: 'किती माज हिला..', तृतीय पंथीयांशी ईशा देओलचं वागणं पाहून भडकले नेटकरी

एका फॅशन आऊटलेटच्या उद्घाटनाला गेलेल्या ईशा देओलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि अभिनेत्रीला त्यावरनं ट्रोल केलं जात आहे.

प्रणाली मोरे

Esha Deol Video: अनेक लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारुन प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे ईशा देओल तख्तानी .अभिनेता धर्मेंद् आणि हेमामालिनी  यांची लेक असलेल्या इशाने काही मोजक्या चित्रपटांमध्ये काम केलं.

मात्र, त्यानंतर तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. परंतु, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम नेटकऱ्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

ब्रेकनंतर हळूहळू ईशा देओल पुन्हा कमबॅक करत आहे. ईशाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तीचा घमेंडीपणा पाहून तिचं ट्रोलिंग केलं आहे.

हेही वाचा: भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

झालं असं की ईशा देओल एका फॅशन आउटलेटच्या उद्घाटनाला गेली होती. जेव्हा तिला तिच्यासोबत फोटो क्लिक करू इच्छिणारे काही तृतीयपंथी भेटले. त्यापैकी एक तिला आशीर्वाद देण्यासाठी पुढे गेली अन् ईशा देओल अस्वस्थ असल्याचे दिसून आले.

इतकेच नव्हे तर ती कारमधून देखील उतरली नाही. तिच्या चाहत्यांशी हस्तांदोलन करण्याची तिची इच्छा दिसत नव्हती. तिनं लगेच कारची काच वर करून घेतली आणि तडक निघून गेली. अभिनेत्रीच्या या अॅटिट्युडमुळे नेटकरी मात्र तिच्यावर भलतेच नाराज झाले आहेत.

एका नेटकऱ्यानं लिहिले, “अ‍ॅटिट्यूड किती हिला.” दुसर्‍याने लिहिले, “कार मधून तर उतरली नाही आणि चाहत्यांना शेकहॅंडही केलं नाही.” दुसरा म्हणाला, "हात मिळवला असता तर छोटी झाली असती का" इतरांनी लिहिले, “ती इतकी अस्वस्थ आणि घाबरलेली दिसते की जणू ते तिला खाऊन टाकतील गंभीरपणे हे करणे खूप वाईट आहे " कोणता माज हिला आहे"

वर्क फ्रंटवर, अजय देवगण सोबत 'रुद्र: द एज ऑफ डार्कनेस' मध्ये शेवटची दिसलेली, अभिनेत्री अमित साध, तिग्मांशू धुलिया आणि मिलिंद गुणाजी यांच्यासह अनटायटल प्रोजेक्टमध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT