Evelyn Sharma  Instagram
मनोरंजन

'ये जवानी..'मधील 'लारा' आठवतेय? एवलिनने ऑस्ट्रेलियात केलं लग्न

एवलिनने सोशल मीडियावर पोस्ट केला लग्नाचा फोटो

स्वाती वेमूल

'ये जवानी है दिवानी' yeh jawaani hai deewani या चित्रपटात 'लारा'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री एवलिन शर्मा Evelyn Sharma नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. एवलिनने डॉक्टर तुशान भिंडी Dr Tushaan Bhindi याच्याशी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन इथं लग्न केलं. १५ मे रोजी तिचा विवाहसोहळा पार पडला असून सोशल मीडियावर तिने नुकतेच लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. लग्नापूर्वी एवलिन आणि तुशान हे एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. २०१९ मध्ये या दोघांनी साखरपुडा केला होता. (Evelyn Sharma weds beau Dr Tushaan Bhindi in Brisbane)

लग्नाविषयी एवलिन म्हणाली, "तुमच्या सर्वांत खास मित्राशी लग्न करण्यापेक्षा चांगली गोष्टी आणखी कोणती असूच शकत नाही. एकमेकांसोबत संपूर्ण आयुष्य व्यतित करण्यासाठी आम्ही दोघं खूप उत्सुक आहोत." तुशान हा ऑस्ट्रेलियातच राहणारा असून तिथे तो डेंटल सर्जन म्हणून काम करतो. सिडनी हार्बर ब्रीज या रोमँटिक ठिकाणी तुशानने एवलिनला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. त्यावेळी एवलिनने त्याच्यासोबतचा रोमँटिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

कोरोना महामारीमुळे एवलिन आणि तुशानने मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्नसोहळा उरकला. मात्र परिस्थिती ठीक होताच मित्रपरिवारासाठी रिसेप्शनचं आयोजन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. एवलिनने 'मै तेरा हिरो', 'जब हॅरी मेट सेजल', 'साहो' यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat Elections : राज्यातील 15,155 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार! 'या' दिवशी प्रसिद्ध होणार अंतिम मतदार यादी; कधी होणार मतदान?

पाकिस्तानी गोलंदाजावर अपात्रतेची कारवाई! उत्तेजक चाचणीत दोषी आढळला, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्याकडून झाला गुन्हा

Success Story : एका मिस्ड कॉलने बदलले नशीब! भारतीय इंजिनिअरने अमेरिकेत उभी केली 8300 कोटी रुपयांची AI कंपनी, नेमकं कसं केलं पाहा

ROHIT SHARMA RECORDS: रोहित शर्माचे 'हे' ५ जागतिक विक्रम मोडणं अशक्य! नंबर १ रेकॉर्ड तर कदाचित कधीच तुटणार नाही

Latest Marathi News Live Update : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड ट्रेनचा पहिला टप्पा २०२७ मध्ये खुला केला जाईल

SCROLL FOR NEXT