Ex-IAS officer abhishek singh threatens Nana Patekar SAKAL
मनोरंजन

Nana Patekar: पुढच्या वेळी उत्तर प्रदेशला आलात तर... माजी IAS अधिकाऱ्याने नाना पाटेकरांना दिली धमकी

व्हिडीओ बनवत माजी IAS अधिकाऱ्याने नानांना धमकी दिलीय

Devendra Jadhav

नाना पाटेकर हे गेल्या काही दिवसांपासुन चांगलेच चर्चेत आले. नाना पाटेकर वाराणसीमध्ये शुटींग करताना त्यांनी सेल्फी घ्यायला आलेल्या एका मुलाच्या डोक्यावर जोरात मारलं होतं.

नानांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर विविध स्तरांंमधून नानांना नाराजी पत्करावी लागली. झालेल्या प्रकाराबद्दल नानांनी स्वतः माफी मागितली.

पण आता या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालंय. माजी IAS अधिकारी अभिषेक सिंगने नानांना धमकी दिली आहे. काय घडलंय? वाचा सविस्तर

(Ex-IAS officer abhishek singh threatens Nana Patekar)

माजी IAS अधिकाऱ्याने दिली नानांना धमकी

अभिषेक सिंह म्हणाला, "उत्तर प्रदेशातील लोकांना एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया कशी द्यायची ते चांगलेच माहीत आहे. आम्ही सर्व बाजूंनी परिपूर्ण आहोत. आम्ही पाहुण्यांचे स्वागत आणि त्यांचा आदर सर्वोत्तम प्रकारे करतो. पण आम्ही मारहाण देखील चांगली करु शकतो.

त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही युपीमध्ये याल तेव्हा तुमच्याशी चांगला व्यवहार होणार नाही याची आम्ही विशेष काळजी घेऊ."

नाना पाटेकर यांनी जेव्हा त्या तरुणाला मारलं होतं त्यानंतर काही दिवसांनी एका पत्रकार परिषदेत माजी आयएस अभिषेकने हा प्रकार चुकीचा असल्याचे म्हटले होते. तो म्हणाला होता, 'पीडित तरुणाने आमच्याशी संपर्क साधल्यास कारवाई करू. पीडित तरुणाने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी."

IAS अभिषेकने दिलेल्या धमकीवर नाना कसं प्रत्युत्तर देणार याची सगळीकडे चर्चा आहे.

नाना पाटेकर यांनी काही दिवसांपुर्वी व्हिडीओच्या माध्यमातुन झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली होती. नाना म्हणाले, "मला माहित नव्हते की तो कोण होता? मला वाटले की तो आमच्या क्रूपैकी एक आहे, म्हणून ठरलेल्या रिहर्सलनुसार मी त्याला मारलं आणि त्याला निघून जाण्यास सांगितले.

मी कधीही कोणाला फोटो काढण्यास नकार दिला नाही. मी असे कधीच केले नसते...जे काही झाले ते चुकून झाले. काही गैरसमजांमुळे हे घडले. मला क्षमा करा. मी पुन्हा असं कधीच करणार नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

Ganesh Festival 2025 : खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या; पूजा आणि सजावटीच्या साहित्यासाठी पुणेकरांची लगबग

SCROLL FOR NEXT