Facebook Game Movie  esakal
मनोरंजन

Facebook Game : कुणाचा होणार आता 'फेसबुक गेम'? सुरु होणार अनोखा खेळ!

फेसबुक या सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे हाताळत ही मर्डर मिस्ट्री रचण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Facebook Game Movie : मराठी मनोरंजन विश्वामध्ये वेगवेगळ्या विषयांवरील कलाकृती प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. नजीकच्या काळात आणखी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱे चित्रपट, मालिका प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून फेसबूक गेमची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. त्यावरुन चाहत्यांना, नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे की हा प्रकार नेमका आहे तरी काय?

सध्या मराठी चित्रपटांची चलती असताना कुठेतरी सस्पेन्स थ्रिलर चित्रपट दिसेनासे झाले आहेत. सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाचे प्रेक्षक सध्या अशा आगळ्या वेगळ्या कथेच्या शोधात आहेत. यातच भर घालत लवकरच नवा कोरा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. 'फेसबुक गेम' एक अनोखा खेळ? असा हा मर्डर मिस्ट्री असलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

ललिता पवार प्रॉडक्शन फिल्म आर्ट' प्रस्तुत आणि समीर पवार निर्मित, दिग्दर्शित 'फेसबुक गेम' या मर्डर मिस्ट्रीची कथा रंगवण्यासाठी मालिका विश्वाचा लाडका चेहरा, हँडसम अभिनेता अमित भानुशाली येणार आहे. ठरलं तर मग या मालिकेनंतर अमित 'फेसबुक गेम' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे.

Facebook Game

फेसबुक या सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे हाताळत ही मर्डर मिस्ट्री रचण्यात आली आहे. सोशल मीडियाचे चांगले आणि वाईट असे दोन्ही पदर या चित्रपटातून उलगडणार आहेत. अमितसह या चित्रपटात गिरीजा जोशी, जयराज नायर, अनिकेत केळकर, संजय खापरे, संदेश जाधव हे कलाकार दिसणार आहे.

'फेसबुक गेम' या चित्रपटाची निर्मिती मानसी मापुस्कर, रुद्राश पवार यांनी केली असून चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि निर्माता अशी तिहेरी धुरा समीर पवार यांनी सांभाळली आहे. येत्या २३ ऑगस्ट २०२३ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज होणार आहे. ही मर्डर मिस्ट्री पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT