Kiran Mane's Old Memories with Ashok Saraf
Kiran Mane's Old Memories with Ashok Saraf esakal
मनोरंजन

अशोक मामांचे ते शब्द खरे ठरले. काय आहे किरण मानेंचं सत्य?

सकाळ ऑनलाईन टीम

मराठी मालिकेतील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या किरण मानेंना क्वचितच कोणी विसरेल. त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या फेसबुकवरील निरनिराळ्या पोस्ट मुळे ते सतत चर्चेत असतात.किरण यांनी 'मुलगी झाली हो' या स्टार प्रवाह वरील मालिकेत एका कर्तव्यदक्ष वडिलांचा अभिनय केला होता. या अभिनयामुळे त्यांना प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम आणि प्रशंसा मिळाली.प्रेक्षकांचे आवडते किरण माने तसे तर नेहमीच चर्चेत असतात पण त्यांनी टाकलेल्या नुकत्याच एका पोस्ट मुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.तर जाणून घेऊया त्यांच्या या पोस्ट बद्दल.

साताऱ्यातून चमकलेल्या या प्रसिद्ध कलाकाराला एके काळी कोणी तरी अभिनयात फार प्रसिद्धी कमवशील असे म्हटले होते.आणि बघता बघता ते वाक्य खरं ठरलं आणि आजचा प्रसिद्ध कलाकार म्हणून 'किरण माने' यांना आपण ओळखतोच.फेसबुकवर या कलाकाराच्या विचारांना बऱ्याच प्रतिक्रिया मिळतात.त्यांची भेट झालेला त्यांच्या आयुष्यातील एखादा साधा व्यक्ती असो वा मग एखादा दिग्गज कलाकार,माने प्रत्येकाशीच प्रेमाने बोलतील आणि अनेकदा भेट झालेल्या व्यक्तीविषयी ते त्यांच्या फेसबुक आणि ट्विटर ला सुंदर शब्दांत वर्णनही देतील,असे ते आहेत.

नुकत्याच फेसबुकवर मानेंनी टाकलेल्या त्यांच्या पोस्टसाठी ते चर्चेत आले आहेत.मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार अशोक सराफ यांच्या सोबतचा एक जुना फोटो शेयर करत त्यांनी अशोक सराफ या मराठी अभिनेत्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिलाय.श्वेता शिंदे आणि अशोक सराफ यांच्याशी गप्पा गोष्टी करतानाचे एक छायाचित्र आणि सोबतच फार जुना सराफांचा किरण आणि त्यांच्या वडिलांसोबतचे त्याला जोड छायाचित्र त्यांच्या फेसबुकला टाकत सराफांबद्दल लिहिले आहे.

"बोलता-बोलता मामा अचानक माझ्या वडलांना-दादांना म्हन्ले, "एकतर मी खोटं बोलत नाही. आणि दूसरं म्हणजे मी प्रत्येकाबद्दल असं बोलत नाही, हे आधी सांगतो.. तुमचा मुलगा किरण हा ब्रिलीयंट ॲक्टर आहे. तो या इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान निर्माण करेल. बघाच तुम्ही."असे सांगत त्यांनी त्यावेळी मराठी अभिनेता अशोक सराफांनी म्हटलेल्या वाक्याची आठवण काढली आहे.तसेच "नोकरी-धंदा सोडून अभिनयासारख्या बेभरवशाच्या क्षेत्रात जान्याच्या माझ्या निर्णयानं, माझ्यावर कायम नाराज असलेले माझे वडिल, तवापास्नं माझे फॅन झालेत. माझ्या प्रत्येक चढउतारावर माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत !" असे सांगत त्यांनी वडिलांचे त्यांच्याप्रति असलेले प्रेम उघडपणे व्यक्त केले आहे.

त्यांची ही पोस्ट सध्या चांगली व्हायरल होत असून त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. दरम्यान किरण माने यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात आले होते. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली, असा आरोप किरण माने यांनी केला होता. यानंतर किरण माने हे सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT