Fahad Ahmad Wish Swara Bhasker Birthday Esakal
मनोरंजन

Swara Bhasker Birthday: 'वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा' म्हणतं स्वराच्या नवऱ्याने चिमटा काढला मात्र नेटकऱ्यांची भलतीच सटकली

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आज तिच्या वाढदिवसानिमित्त चर्चेत आहे. आज ती तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे.

या खास दिवशी तिच्या चाहत्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याचवेळी तिचा पती फहाद अहमदनेही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

मात्र फवादने शुभेच्छा देताच सोशल मिडियावर त्याला पुन्हा ट्रोल करण्यास सुरवात झाली आहे.

राजकारणी फहाद अहमद यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक नोटसह दोघांचा फोटो शेअर केला आहे. दोघेही या फोटोत खुप सुंदर दिसत आहेत. मात्र या फोटो ऐवजी त्याच्या कॅप्शनने नेटकऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.

कारण त्याने या पोस्टमध्ये स्वराला भाई म्हटलं आहे. त्याचबरोबर पोस्टच्या शेवटी फहादने 'भाई हे जेंडर न्यूट्रल आहे' असं देखील स्पष्ट केल आहे.

याआधी स्वरा भास्करने लग्नाच्या अनेक वर्षांपूर्वी एका पोस्टमध्ये त्याला भाऊ म्हटले होते, त्यानंतर तिनं लग्नाची बातमी दिली ज्यावरून नंतर वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा तिच्या नवऱ्याच्या या पोस्टमुळे चर्चा सुरु झाल्या आहेत.

फहादने शेअर केलेल्या फोटोमध्ये स्वरा भास्कर हसताना आणि फहादच्या खांद्यावर डोके ठेवून त्याच्या शेजारी बसलेली दिसते.

फहादने फोटोसोबत लिहिले ,'या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुमटा सल्ला ऐकून मी आज विवाहित आहे, तुम्हाला twitter वरून कळेलच अशी मला आशा आहे. मला प्रत्येक बाबतीत परीपूर्ण केल्याबद्दल धन्यवाद, तुमच्यासारखा मित्र आणि मार्गदर्शक मिळाल्याने मी धन्य आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे PS-भाई हे जेंडर न्यूट्रल आहे.'

त्याच झालं असं की याआधी स्वराने फहादला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतांना 'भाई' म्हटलं होतं आणि तिने जेव्हा लग्नाची घोषणा केली त्यावेळी तिचं हे ट्विट सोशल मिडियावर खुप व्हायरल झालं होत आणि लोकांनी तिच्यावर खुप टिकाही केली होती.

आता स्वराला पुन्हा त्याच शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा देत फहाद नेटकऱ्यांना चिमटा काढला आहे. मात्र त्याची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकरी पुन्हा पुन्हा एकदा भडकले आहेत आणि त्याला ट्रोल करु लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT