fakt marathi sanman winner dharmveer and chandramukhi movie sakal
मनोरंजन

फक्त मराठी सन्मान: धर्मवीरची बाजी, चंद्रमुखीचा डंका..

'फक्त मराठी सिने सन्मान' या पुरस्कारावर 'धर्मवीर' आणि 'चंद्रमुखी' या चित्रपटांनी विजयाची मोहर उमटवली आहे.

नीलेश अडसूळ

fakt marathi sanman : 'फक्त मराठी' वाहिनी तर्फे दिला जाणारा 'फक्त मराठी सन्मान' हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी 'धमर्वीर' आणि 'चंद्रमुखी' या चित्रपटांनी सर्वाधिक पुरस्कार मिळवत बाजी मारली. यावेळी दोन्ही चित्रपटांना भरगोस पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. या वाहिनीतर्फे आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच सन्मान सोहळा होता. त्यामुळे कलाकारांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.

(fakt marathi sanman winner dharmveer and chandramukhi movie)

शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनपट असलेला "धर्मवीर" मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे रोजी रिलीज झाला होता. तर विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित 'चंद्रमुखी' हा चित्रपट 29 एप्रिल रोजी रिलीज झाला होता. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरही चांगलीच कमाई केली. आता पुरस्कारांवरही या चित्रपटांचे नाव कोरले जात आहे.

"फक्त मराठी सिने सन्मान २०२२" च्या पुरस्कार सोहळ्यात या 'धर्मवीर' (dharmveer movie)आणि ''चंद्रमुखी'' (chandramukhi marathi movie) चित्रपटाने प्रत्येकी सात-सात पुरस्कार पटकावले आहेत. 'धर्मवीर' चित्रपटाला सर्वात्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट लेखन प्रविण विठ्ठल तरडे, सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रसाद ओक, सर्वोत्कृष्ट गीतलेखन मंगेश कांगणे, सर्वोत्कृष्ट गायक आदर्श शिंदे, सर्वोत्कृष्ट रंगभूषा विद्याधर भट्टे असे पुरस्कार मिळाले.

तर चंद्रमुखी चित्रपटालाही सर्वोत्कुष्ट अभिनेत्री अमृता खानविलकर, सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा मृण्मयी देशपांडे, सर्वोत्कृष्ट गायिका आर्या आंबेकर, सर्वोत्कृष्ट कसिनेमॅटोग्राफी संजय मेमाणे आणि आणि सर्वोत्कृष्ट खलनायक राजू शिसाटकर,सर्वोत्कृष्ट कथा विश्वास पाटील आणि विशेष पुरस्कार अजय -अतुल असे सात पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil Jitendra Awhad Eknath Shinde : जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड रात्रीतून एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंद दाराआड ४५ मिनीटांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

Miraj Assembly Constituency : 'मिरज मतदारसंघ खुला झाला तरी मी निवडणूक लढवणारच'; आमदार खाडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, राजकीय समीकरणे बदलणार?

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा मुसळधार! 'या'१२ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी, हवामानाचा विभागाचा अंदाज

Suraj Sakhare Firing in Kolhapur : डोळ्यांदेखत गोळीबार पाहून बोबडीच वळली; टायर फुटल्यासारखा मोठा आवाज अन्..; प्रत्यक्षदर्शी कामगाराने सांगितला घटनेचा थरार

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! मगरपट्ट्याचा उड्डाण पूल पाडणार; भैरोबानाला-हडपसर ते यवत ३६.५ किमी उड्डाण पूल हाेणार, मेट्रो विस्तारालाही गती

SCROLL FOR NEXT